अहमदनगर अर्बन बँक 3 कोटी अपहार प्रकरण, भाजपा खासदारावर गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

अहमदनगर अर्बन बँक 3 कोटी अपहार प्रकरण, भाजपा खासदारावर गुन्हा दाखल

 अहमदनगर अर्बन बँक 3 कोटी अपहार प्रकरण, भाजपा खासदारावर गुन्हा दाखल

अखेर मा. खासदार दिलीप गांधीवर गुन्हा दाखल!

पदच्युत संचालक मंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर अर्बन बँकेच्या माजी संचालक व समर्थक सभासदांनी आज सायंकाळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. कथित गैर कारभाराबाबत गुन्हा दाखल करण्यापूर्वी आमची भूमिकाही समजून घ्यावी, अशी मागणी त्यांनीही अधीक्षक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली. बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक कटारिया, माजी अध्यक्ष राधावल्लभ कासट, विजय मंडलेचा, राजेंद्र अग्रवाल, दीपक गांधी, मीना राठी, नवनीत सूरपुरिया, अजय बोरा, शैलेश मुनोत, शंकर अंदानी, केदार केसकर, सुवेंद्र गांधी आदी यावेळी उपस्थित होते.

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर अर्बन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी, तत्कालीन शाखा अधिकारी घनशाम अच्च्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आदींवर संगनमताने कट रचून बँकेची तीन कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद मारूती औटी यांनी दिली.
    गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माजी संचालक राजेंद्र गांधी व पोपट लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली बँकेच्या सभासदांनी काल प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे प्रशासक मिश्रा यांनी बँकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी मारूती औटी यांना फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
    भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की 7 ऑक्टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप मनसुखलाल गांधी (रा. आनंदऋषी मार्ग, नगर), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ (रा. अर्बन बँक कॉलनी, सावेडी, नगर), कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतीश लांडगे (रा. वेदांतनगर, सावेडी, नगर) व संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचून, संगनमताने बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार केला. यात ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केला आहे. तीन कोटी रुपयांची रक्कम या आर. बी कासार, देवी एजन्सी व गिरीराल एंटरप्राइजेस यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेत बँकेची फसवणूक केली आहे. संबंधितांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी, अफरातर व फसवणूक केली आहे. याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोजन महाजन करत आहेत.

No comments:

Post a Comment