ढगाळ वातावरण.. एैन थंडीत रिमझिम..पाऊस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

ढगाळ वातावरण.. एैन थंडीत रिमझिम..पाऊस

 ढगाळ वातावरण.. एैन थंडीत रिमझिम..पाऊस


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरात ऐैन थंडीत अनेक प्रभागात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी धूकेही पसरले आहे. अशा वातावरणामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे.
   आज सकाळपासून ढगाळ वातावरण व पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात पाऊस झाला आहे.  या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून किरकोळ स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाबरोबरच वाल, पावटा, भुईमूग, तूर यासारख्या कडधान्य पिकानाही बसतो आहे.  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस होत आहे . मागील 4 ते 5 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकं संकटात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातही पावसाचा फटका शेतीला बसलाय. पावसामुळे द्राक्ष कांदा धोक्यात आलाय. काही तालुक्यात दाट धुकं आहे. अनेक तालुक्यात पावसासह धुकं पसरलं आहे. मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. मुंबईत काल रात्रीपासून शहर आणि उपनगरात संततधार सुरू आहे. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

No comments:

Post a Comment