गुंडेगाव येथे बचत गटाच्या माध्यमातून कंपनीची स्थापना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

गुंडेगाव येथे बचत गटाच्या माध्यमातून कंपनीची स्थापना

 गुंडेगाव येथे बचत गटाच्या माध्यमातून कंपनीची स्थापना

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बचत गटांना  विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  कृषी विभागाच्या वतीने   नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे  बचत गटाच्या माध्यमातून  गुंडेगाव येथे  रामेश्वर बचत गट संचालित  शुढळेश्वर शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड गुंडेगाव   कंपनीची स्थापना करण्यात आली आसून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने विकासाला चालना मिळाली आहे व कंपनी च्या माध्यमातून गुंडेगाव येथील शेतकर्याना खते ,बियाणे, कीटकनाशके, औषधे उपलब्ध होणार असून याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे आसे मत नगर तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी व्यक्त केले आहे गुंडेगाव येथे   शुढळेश्वर शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड चे उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी अधिकारी नारायण कारंडे, गुंडेगावचे कृषी सहाय्यक लांडगे साहेब उपस्थित होते.  गुंडेगाव येथे 2002 साली रामेश्वर बचत गटाची स्थापना करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment