महावितरणच्या भोंगळ कारभाराचा गिरणी चालकांना होतोय मनःस्ताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

महावितरणच्या भोंगळ कारभाराचा गिरणी चालकांना होतोय मनःस्ताप

 महावितरणच्या भोंगळ कारभाराचा गिरणी चालकांना होतोय मनःस्ताप

महावितरण कार्यालयात ठिय्या


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः विजेच्या कारणास्तव त्रस्त झालेल्या जामखेड तालुक्यातील पीठ गिरणी चालकांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच ठीय्या आंदोलन केले. तसेच आपल्या तक्रारारींचा पाठ अधिकार्यांना वाचुन दाखवला तसेच लवकरात लवकर समस्या सोडवल्या नाहीत तर निरंतर सेवा पीठ गिरणी कामगार महासंघ यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
   कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्या गिरणी कामगार पुन्हा विजेच्या लपंडावाने मेटाकुटीला आला आहे. आधीच कोरोनामुळे आथिर्क हतबल झालेल्या नागरिकांना आता महावितरणच्या चुकीचा आर्थिक भार सहन करण्याची वेळ आली आहे. तसेच नागरिकांची पिळवणूक करत विज वितरण कंपनीकडून ग्राहकांना बोगस बिले पाठविली जात आहे. बंद असलेल्या घरात विजेचा वापर नसतांनाही अशा विज ग्राहकांना तब्बल पाच हजार रुपयांचे बिले पाठविण्यात आले आहे. बोगस मीटर रेडींग नोंदवून ग्राहकांकडून दामदुप्पट विजेच्या बिलाची आकारणी होत असल्याचे प्रकार तालुक्यात होत आहे. यामुळे ग्राहकांनमधुन संताप व्यक्त होत आहे वेळोवेळी मागण्या करुनही महावितरणा कडुन दखल घेतली जात नसल्याने आखेर आज दि 4 डिसेंबर रोजी निरंतर सेवा पिठ गिरणी कामगार महासंघाच्या वतीने तालुक्यातील गिरणी कामगारांच्या समवेत जामखेड येथील महावितरण कार्यालयात ठीय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान गिरणी कामगारांनी आपल्या समस्या मांडताना सांगितले की ग्रामीण भागात विजेच्या लपंडावाने गिरणी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वापरलेल्या युनीट पेक्षा जादा दर अकारु नयेत. गीरणी चालकांना सध्या दळण दळुण द्यायला परवडत नाही त्यामुळे शेतीपंपा प्रमाणे पन्नास टक्के वीजबिलात सवलत देण्यात यावी. लाईट ये जा करत आसल्याने पीठाचे नुकसान होत आहे. यानंतर निरंतर पीठ गिरणी कामगार महासंघाचे राज्य सचिव अशोक सोनवणे यांनी बोलताना सांगितले की तालुक्यात घरघंटी मुळे गिरणी वाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरघंटी चा बंदोबस्त केला नाही तर जानेवारी मध्ये एकही पीठ गिरणीवाला आपल्या गिरणीचे लाईट बील भरणार नाही. तसेच कोरोना च्या काळात कीराणा, भाजीपाला, यांना अत्यावश्यक दर्जा देण्यात आला मात्र गीरणी वाल्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला नाही त्यामुळे पीठ गिरणी चा देखील अत्यावश्यक सेवेत समावेश करावा. अशा अनेक मागण्या पीठ गिरणी चालकांन कडुन करण्यात आल्या.
    यानंतर महावितरण चे उपकार्यकारी अभियंता कासलीवाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निरंतर पीठ गिरणी कामगार महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर बागुल, राज्य सचिव अशोक दादा सोनवणे,  दक्षिण जिल्हा अध्यक्ष भिमराव पाटील, शाखा अध्यक्ष अरुण अण्णासाहेब अढाव, उपाध्यक्ष मंजुर बाबुलाल आतार, परमेश्वर मुळीक, सुदाम रोडे, बापुराव बहीर, आशोक शेंबडे, उद्धव क्षीरसागर, सह अनेक गीरणी चालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment