उभ्या ऊसाला आग लावून केले लाखोंचे नुकसान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

उभ्या ऊसाला आग लावून केले लाखोंचे नुकसान

 उभ्या ऊसाला आग लावून केले लाखोंचे नुकसान

बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील मनोहर शिवराम जगताप यांचा कारखान्याला गाळपासाठी तयार झालेल्या 2 एकर उसाला मागील वादातून आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले प्रकरणी मनोहर जगताप यांची पत्नी मनीषा यांनी 7 जणा विरुध्द बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या बाबत सविस्तर असे की तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील शेतकरी मनोहर शिवराम जगताप यांचा गट नं 911 मधील उस गाळपासाठी तयार असून दि.13 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मागील भांडणातून रोहिदास रावसाहेब पंदरकर, दत्तात्रय रावसाहेब पंदरकर, शशिकला रावसाहेब पंदरकर, बापू मारुती पंदरकर, सुनंदा बापू पंदरकर, जयवंत बापू पंदरकर, महादेव बापू पंदरकर यांनी सुमारे 2 एकर उसाला आग लावली. आग लावलेला उस जळून खाक झाल्याने मनोहर जगताप यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात मनोहर जगताप यांची पत्नी मनिषा यांनी दि. 13 रोजी रात्री उशिरा तक्रार दाखल केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here