टाकळीमियाँ, सोनगाव, सात्रळला आधारकेंद्र सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

टाकळीमियाँ, सोनगाव, सात्रळला आधारकेंद्र सुरू

 टाकळीमियाँ, सोनगाव, सात्रळला आधारकेंद्र सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्यातील नागरिक , ग्रामस्थांना आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी आता राहुरीत हेलपाटे मारावे लागणार नसून टाकळीमिया, सोनगाव - सात्रळ येथे ही केंद्रे नव्याने सुरू झाल्याने विद्यार्थी , पालकांसह ग्रामस्थांना ’आधार ’निर्माण होणार आहे . प्रस्तुत दैनिकाने यापूर्वी याविषयी लोकभावना विचारात घेऊन वृत्त दिले होते.
राहुरी तालुक्यातील नागरिकांना आधार कार्ड नवीन नोंदणी दुरुस्ती ,अपडेट प्रक्रिया करण्यासाठी गत दोन ते अडीच वर्षांपासून राहुरी शहरात एकमेव आधार केंद्रावर यावे लागत होते . याठिकाणी एका दिवशी फक्त 25 ते 30 व्यक्तींना ही सुविधा उपलब्ध होती . ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना मात्र याचा फटका बसत होता . आधार केंद्रांची तालुक्यात संख्या वाढवण्याची मागणी वारंवार होत होती . मात्र कासवगती व वेळकाढूपणा असणार्‍या स्थानिक प्रशासनाचा यासाठी अडसर बनत जात होता . जांभूळबन ,म्हैसगाव या व पाथरे , माहेगाव या 30-32 किलोमीटर अंतरावरील अनेक गावातील ग्रामस्थांना राहुरीत येऊन , यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत होते .
2016-17 या काळात राहुरी शहरासह तालुक्यात 25-28 ठिकाणी सेतू सुविधा केंद्रांवर आधार नोंदणी करण्यात येत होती . ग्रामीण भागातील नागरिक विद्यार्थी याचा लाभ घेत होते. मात्र नोंदणी प्रक्रियेत अनियमितता व काही त्रुटी होत असल्याच्या तक्रारी आल्याने वरिष्ठ पातळीवरून ही सर्व केंद्रे , मान्यता बंद करण्यात आले . राहुरी शहरात फक्त एक आधार केंद्र कार्यरत राहिले. त्यामुळे तेव्हापासून व कोरोना महामारी नंतर सुरू झाल्यावर हे केंद्र पुन्हा पूर्ववत झाले .
तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नोंदणी व अपडेट साठी वर्दळ वाढली. शाळकरी लहान मुलांच्या तर शासकीय नियमामुळे आधार नोंदण्या रखडल्या. नियमांमुळे केवळ 25 -30 जणांची नोंदणी व अपडेट शक्य झाली . त्यामुळे हेलपाटे मारावे लागत असल्याने तालुक्यातील अनेकांनी हा विषय सोडून दिला . शाळकरी विद्यार्थ्यांची नोंदणी न झाल्याने पालक वर्ग चिंतेत होता . आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी होत असतानाही स्थानिक प्रशासनाने या विषयी मागणी होऊनही कानावर अक्षरशः कानावर हात ठेवले .
आता तालुक्यात टाकळीमिया , सोनगाव -सात्रळ , येथे आधार नोंदणी केंद्र नव्याने सुरू झाले आहे . टाकळीमिया येथील केंद्रावर तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी , दुरुस्ती व अपडेट सुरू झाले आहे . लहान मुलांची नवीन आधार नोंदणी तर पूर्णपणे मोफत सुरू केली आहे . तालुक्यातील नागरिकांना आधार केंद्रांची संख्या वाढल्याने आता आधार मिळणार असून पालक वर्गाला दिलासा मिळणार आहे .

राहुरी तालुक्यात ग्रामपंचायत , स्थानिक शिक्षण संस्था व शासकीय कार्यालय यांनी मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाची रीतसर परवानगी घेऊन आधार नोंदणी , दुरुस्ती व अपडेट साठी आधार शिबिर ( कॅम्प )घेण्यात येईल.
विकास करपे,
आधार नोंदणी केंद्र चालक, टाकळीमियाँ

राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ होईल , यंत्रणेने मोठ्या लोकसंख्येच्या गावात आणखी आधार केंद्रे सुरू करावी.
सुनील विष्णुपंत देशपांडे
राहुरी (सामाजिक कार्यकर्ता )

No comments:

Post a Comment