स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने कोरोनायोद्धा पुरस्कारचे वितरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने कोरोनायोद्धा पुरस्कारचे वितरण

 स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने कोरोनायोद्धा पुरस्कारचे वितरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः भानसहिवरा (ता.नेवासे) येथे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवसा निमित्त स्व.मुंडे सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने कोरोनायोध्दा पुरस्काराचे वितरण उत्साहात करण्यात आले.
भानसहिवरा येथील श्रीराम विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात महंत सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते एकता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले,डॉ.योगेश साळुंके,ॠषीकेश बोरुडे,सतिष देसाई,नितीन भताने,शंकर मलदोडे यांना शाल,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र किर्तने यांनी प्रास्ताविक केले. नेवासे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.जलमित्र-पत्रकार सुखदेव फुलारी, एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर,उपसरपंच एजाज देशमुख  मुख्याध्यापक झुंबरराव पालवे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले.आभार रेवणनाथ पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment