प्रयोगशाळा परिचर पदावरुन कनिष्ठ लिपिक पदोन्नतीस मान्यता देण्याचे खंडपीठाचे आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

प्रयोगशाळा परिचर पदावरुन कनिष्ठ लिपिक पदोन्नतीस मान्यता देण्याचे खंडपीठाचे आदेश

 प्रयोगशाळा परिचर पदावरुन कनिष्ठ लिपिक पदोन्नतीस मान्यता देण्याचे खंडपीठाचे आदेश

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अवर्षण प्रवण क्षेत्र प्रसारक मंडळ,जवळके-धोंडेवाडी,ता. कोपरगाव संचलित शेतकरी माध्यमिक विद्यालयातील रमेश आनंदराव गव्हाणे त्यांच्या कनिष्ठ लिपिक पदोन्नतीस मान्यता देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत .अर्जदार गव्हाणे हे उपरोक्त संस्थेच्या विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते.मा शिक्षणाधिकारी यांच्याकडे सदर प्रस्ताव  मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.शिक्षणाधिकारी कार्यालयाने मात्र सदर मान्यतेस नकार दिला होता.
अर्जदाराने उच्च न्यायालयात सदर याचिकेस आव्हान दिले असता मा उच्च न्यायालयाने संबंधितांचे म्हणणे ऐकून शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश रद्दबादल केले व कनिष्ठ लिपिक पदावर संस्थेने दिलेल्या नेमणुकीस मान्यता दिली .सदर पदोन्नती महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती )अधिनियमानुसार वैध असल्याचा निर्वाळा दिला आहे .तसेच कनिष्ठ लिपिक पद सरळ सेवाभरतीद्वारे भरले जाऊ शकते अशी शिक्षणाधिकार्‍यांची  धारणा चुकीची असल्याचे निर्देश करण्यात आले आहेत.सदर प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. सी के शिंदे यांनी काम पाहिले  तर प्रतिवादी महाराष्ट्र शासनाची बाजू सहायक सरकारी वकील श्री केंद्रे यांनी मांडली .प्रतिवादी संस्थेच्या वतीने   अ‍ॅड. नीलेश भागवत यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment