30 ग्रामपंचायती बिनविरोध! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

30 ग्रामपंचायती बिनविरोध!

 30 ग्रामपंचायती बिनविरोध!

आ. लंकेंच्या हटके ऑफरनंतर..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर : आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आव्हान केलं होतं. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यांच्या हटके ऑफरनंतर आता 30 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणार आहे.
आतापर्यंत तब्बल 30 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आणखी 10 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विश्वास आ. लंके यांनी व्यक्त केला. त्यामुळे एकूण 40 ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक लढणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावागावात वाद-विवाद, भांडण होऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवली. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा असे लंके यांनी आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील तब्बल 30 गावातील ग्रामपंचायतने बिनविरोध करण्याचा   निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर आणखी 10 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणार असल्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.आमदार निलेश लंके यांनी केलेल्या आवाहनाला सर्वात पहिले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत प्रतिसाद देत बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता तीस ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकोपा टिकवण्यासाठी सर्व घटकांना समान न्याय देऊन आपली ग्रामपंचायत बिनविरोध करा,तुमच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी असेल, असं देखील आवाहन आमदार निलेश लंके यांनी फेसबुकवर देखील केलं होतं.संपूर्ण राज्यात येत्या 15 जानेवारी पासून राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या काळात गावागावात भांडणं, मतभेद, कलह निर्माण होऊ नये यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवत अनोखे आवाहन गावकर्‍यांना केले. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी घ्या असे आवाहन लंके यांनी केले. या आवाहनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावाने सर्वात पाहिले प्रतिसाद दिलाय. राळेगण सिद्धी गावात अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. गावात 2 गट असतानाही गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय.
राळेगण सिद्धी गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात करण्यास सुरुवात केली. प्रत्येक गावात जाऊन बिनविरोध निवडणूक लढवण्याचे फायदे सांगितले आणि आमदारांच्या आवाहनाला गावकर्‍यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. आज पारनेर मधील घोसपुरी गावाने देखील बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. घोसपुरी हे पारनेर मधील 30 वे गाव आहे ज्याने हा निर्णय घेतलाय. पारनेर मतदार संघातील 110 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 30 गावांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment