माथाडी कामगारांना 5 लाखाची विमा सुरक्षा : घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

माथाडी कामगारांना 5 लाखाची विमा सुरक्षा : घुले

 माथाडी कामगारांना 5 लाखाची विमा सुरक्षा : घुले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील 2410 नियमित पगार घेणार्‍या माथाडी कामगारांना अहमदनगर माथाडी कामगार मंडळाकडून कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास रु.5 लाख अपघात विमा योजनेचा लाभ त्यांचे कुटुंबीयास मिळणार आहे. तसेच रु.1 लाखापर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करण्यात आल्याचे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस कामगार नेते अविनाश घुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यापूर्वी माथाडी कामगारांना रु.3 लाख अपघात विमा व रु. 75 हजार पर्यंत वैद्यकीय विमा योजना घेण्यात आली होती. परंतु वाढत्या महागाईचा विचार करता माथाडी मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त श्री. चंद्रकांत राऊत साहेब. यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील माथाडी कामगारांना रु.5 लाख अपघात विमा व रु.1लाख पर्यंत वैद्यकीय विमा योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यास माथाडी मंडळाचे अध्यक्ष कामगार आयुक्त श्री.चंद्रकांत राऊत साहेब यांनी मंजुरी देऊन दि. 14 डिसेंबर-2020 पासून जिल्ह्यातील माथाडी कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंबीयास रु.5 लाख अपघात विमा व रु. 1 लाख पर्यंत
वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करून या विमा योजनेचा संपूर्ण हफ्ता अहमदनगर माथाडी मंडळाने भरला आहे. याकामी माथाडी मंडळाचे निरीक्षक श्री.सुनील देवकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले. या विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2410 कार्यरत म्हणजेच मंडळात नियमित पगार भरणार्‍या माथाडी कामगारांना मिळणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना अविनाश घुले यांनी सांगितले की अहमदनगर शहर व जिल्ह्यातील मार्केटयार्ड, किराणा ग्रोसरी बाजार, ट्रान्सपोर्ट, रेल्वे मालधक्के, वेअरहाऊस, शासकीय व निमशासकीय गोदामे यामध्ये काम करणार्‍या कष्टकरी कामगारांना माथाडी कायद्याचे संरक्षण मिळाले असून या कायद्यामुळे कामगारांचे जीवनात स्थैर्य प्राप्त झाले असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. माथाडी मंडळात नोंदीत असणार्‍या व नियमित पगार घेणार्‍या माथाडी कामगारांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे रजा, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युइटी, दिवाळी बोनस, वैद्यकीय सुविधा, अपतकालीन आर्थिक मदत, विमासुरक्षा यासह महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या विविध फायद्यांचा लाभ मिळत आहे. असे सांगून माथाडी मंडळाचे अध्यक्ष व सहाय्यक कामगार आयुक्त श्री.चंद्रकांत राऊत साहेब व निरीक्षक सुनील देवकर यांचे आभार व्यक्त केले आहे. सर्व माथाडी कामगारांनी परस्पर मालकाकडून मजुरीची रक्कम न घेता आपली दरमहा होणारी मजुरी व लेव्ही माथाडी मंडळात भरणा करून पगार घ्यावा व जास्तीत जास्त कामगारांनी माथाडी मंडळात कामगार नोंदणी करून माथाडी कामगार मंडळामार्फत दिल्या जाणार्‍या सुविधांचा लाभ घ्यावा असे अहवान मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त श्री.चंद्रकांत राऊत साहेब व हमाल पंचायत अध्यक्ष श्री.अविनाश घुले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment