वयाचा पुरावा दाखवल्याशिवाय लग्न नाही..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

वयाचा पुरावा दाखवल्याशिवाय लग्न नाही..!

 वयाचा पुरावा दाखवल्याशिवाय लग्न नाही..!

‘उडान’ बालविवाह प्रतिबंधक अभियान..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लॉक डाउनच्या काळात लग्नासाठी कमी खर्च येत असल्याचे पाहून अनेक गरीब वधूपित्यांनी अल्पवयीन मुलींची लग्नंही उरकून घेण्याचा सपाटा लावल्याचे चाइल्ड लाइनकडे प्राप्त होणार्‍या तक्रारींवरून दिसून येत आहे.
ग्रामीण भागात ऊस तोडणी कामगार, मजूर, गरीब शेतकरी यांच्यासाठी मुलींचे लग्न हे आव्हानच मानले जाते. समाजासोबत राहण्यासाठी रुढी-परंपरा, मानपान यांचे पालन करीत लग्न करायचे म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर असे चित्र अनेकदा पहायला मिळते. लॉकडाउनच्या काळात केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत आणि घरच्या घरी लग्न करण्यास सरकारने मुभा दिली. अर्थातच नाईलाजानं का होईना, याला समाजमान्यताही मिळाली. हीच संधी समजून अनेक गरीब वधूपित्यांनी कायद्याच्या अज्ञानातून तर कुठे नाइलाजातून आपल्या मुली उजविण्यास सुरुवात केल्याचे आढळून येत आहेत. कारण एकट्या नगर जिल्ह्यात लॉकडाउन काळात जवळपास वीस बालविवाह चाइल्ड लाइनने रोखले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात आजच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत, या कोरोना महामारी अंतर्गत लॉकडाऊन काळात प्रशासन इतर कामात व्यस्त असल्याने कौटुंबिक अडचणी, आर्थिक कारणे, मुलींविषयी सुरक्षितेची चिंता, अज्ञानपण इ. कारणांमुळे बालविवाहाचे प्रमाणात चिंताजनक वाढ झाल्याचे दिसुन आहे. बाल विवाहा चे प्रमाण कमी करण्यासाठी  स्नेहालय , अहमदनगर चाईल्ड लाईन , बाल कल्याण समिती , यांनी पुढाकार घेऊन उडान :  बालविवाह प्रतिबंधक अभियास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील  लग्नपत्रिका प्रिंटिंगप्रेस असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष , जिल्हा पुरोहित संघ  असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ,मंदिर व मंगल कार्यालय असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ,  बँडपथक आणि डीजे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष , केटरिंग असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष, मंडप आणि  डेकोरेशन असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष या अहमदनगर जिल्ह्यातील  बालविवाह संदर्भातील प्रमाणाबद्दल चर्चा करून त्यांना कोणत्याही लग्नाची ऑर्डर घेण्यापूर्वी वर-वधूचे वयाचे दाखले बघितल्याशिवाय ऑर्डर घेऊ नये, जर सदर वर किवा वधु अल्पवयीन असल्यास चाईल्ड लाईन च्या 1098 या टोल फ्री नंबर वर संपर्क करावा असे आवाहन चाईल्ड लाईनच्या वतीने करण्यात आले.
‘लॉकडाउन काळात आमच्याकडे बालविवाहांबाबत येणार्‍या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. आम्ही जवळपास 20 बालविवाह लॉकडाउन काळात रोखले आहेत. लॉकडाउनमध्ये आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले, तरी  कोणाला समजणार नाही, असा समज असल्याचे बालविवाह रोखल्यानंतर संबंधित मुलींच्या पालकांसोबत चर्चा केल्यानंतर लक्षात येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी आमचे विविध यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून पालकांचे समुपदेशन करण्यावर आमचा भर आहे.
उडान: बालविवाह प्रतिबंधक अभियान अतर्गत  बालविवाह थाबवून अभियानमध्ये  सहभागी होणार आहे. या सर्वाना एकत्र करून  यांची जिल्हा पातळीवर उडान बालविवाह बालविवाह प्रतिबंधक समिती गठीत करून या समितीची  बैठक लवकरच होणार आहे. त्याच बरोबर अहमदनगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील बालविवाहाची परिस्थितीची जाणीव करूंन देऊन त्यांना उडान: बालविवाह प्रतीबाधक अभियानाबद्दल  माहिती सांगण्यात आली आहे. त्यामध्ये लवकरच आपल्या अभियाना  अतर्गत जिल्ह्यातील  ग्रामीण आणि शहरी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांची बालविवाह बदल कार्यशाळ घेण्यास सांगितली.

No comments:

Post a Comment