छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

 छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

संस्थेचा वर्तमान काळ इतका उज्वल आहे की, भुतकाळालाही त्याचा अभिमान वाटावा- उद्धव महाराज मंडलिक

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः दिवसाची सुरुवात ही दिनदर्शिका पाहूनच होत असते. दिनदर्शिकेनुसार कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे नियोजन ठरत असते. विविध सण, उत्सव बरोबरच इतर अनेक गोष्टी या दिनदर्शिकेवर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या जीवनात दिनदर्शिकेला फार महत्व आहे. दिनदर्शिकेच्या रुपाने सभासदांना वर्षभराचे नियोजनाची रुपरेषा दिली आहे.  संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या मुल्यांचे योग्य नियोजन करुन चांगला परतावा देत आहे. संस्थेच्या पदाधिकार्यांमध्ये असलेल्या समन्वय वाखणण्याजोगा आहे.  पतसंस्थेच्या कामकाजातील सुक्ष्मनियोजन, अनेक गोष्टीत  केलेल्या अभिनव उपक्रमांमुळे संस्था प्रगतीपथावर आहे. संस्थेचा वर्तमान काळ इतका उज्वल आहे की, भुतकाळालाही त्याचा अभिमान वाटत असला पाहिजे. संस्थेचा भविष्यकाळ दैदिप्यमान असेल यात शंका नाही. संस्थेच्या हिताशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता सभासदांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. एक सकारात्मक उर्जा संस्थेच्या उपक्रमातून सभासदांना मिळते. पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख असाच उंचावत जाईल, असे प्रतिपादन नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थाचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेच्या सन 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थाचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन सुदामराव बनसोडे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर सुर्वे, चंद्रकांत तापकिर, सुनिता बर्वे, भास्करराव सिनारे, भाऊसाहेब पालवे, ज्ञानदेव शिंदे, पोपटराव वरखडे, संतोष देशमुख, भगवान भांड, ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत, डॉ.करण घुले, नगरसेवक सुनिल वाघ, विलासराव वाघ, आसाराम नायन, चंद्रकांत खाडे, मनोज बनकर, मुंगसे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment