स्व. मुंडेे यांना अपेक्षित कार्य करण्याचा प्रयत्न ः सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

स्व. मुंडेे यांना अपेक्षित कार्य करण्याचा प्रयत्न ः सातपुते

 स्व. मुंडेे यांना अपेक्षित कार्य करण्याचा प्रयत्न ः सातपुते

केडगावला भाजपा युवा मोर्चाच्यावतीने वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीबांच्या कल्याणासाठी वेचले. गोरगरीबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले. स्व. मुंडे यांनी खेड्यापाडयांत, तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन समाजाची सेवा केली. स्व. मुंडे यांनी समाजासाठी केलेले कार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सातपुते यांनी केले.
केडगाव देवी परिसरात लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंती दिनानिमित्ताने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी श्री. सातपुते बोलत होते. यावेळी नितीन भुजबळ, कार्तिक तगारे, जीवन चंदन, गणेश मुळे, संदीप चंदन, धनंजय जामगांवकर, युवा मोर्चाचे केडगाव मंडल अध्यक्ष मंगेश खंगले, अमोल आंधळे, सुरेश काळे, अ‍ॅड. भाऊ साठे, राहुल वाघ,  अप्पा आंबेकर, राहुल जाधव, शैलेश सुंबे, प्रसाद हराळ, रोहन भुजबळ, अजित कोतकर, नीलेश सातपुते, महादेव सातपुते, लियाकत सय्यद आदी उपस्थित होते.
राजाभाऊ सातपुते पुढे म्हणाले की, लोकनेते स्व. मुंडे यांना अपेक्षित असलेले कार्य त्यांनी घालून दिलेल्या शिकवणीनुसार जीवनाची वाटचाल करीत आहोत. स्व. मुंडे यांनी त्यांच्या कार्यकुशलतेने अनेकांना घडविले. राज्याला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यामुळे राज्याचे अनेक प्रश्न सुटले आहेत. त्यांना आदर्श नजरेसमोर ठेवून आजच्या युवा पिढीने काम करावे, असे ते म्हणाले.
यावेळी धनंजय जामगांवकर, मंगेश खंगले, नितीन भुजबळ आदींची स्व. मुंडे यांच्या गौरवपर भाषणे झाली.

No comments:

Post a Comment