सरकारी वकील सतीश पाटील यांना ‘समाजभूषण सन्मानपत्र’ प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 18, 2020

सरकारी वकील सतीश पाटील यांना ‘समाजभूषण सन्मानपत्र’ प्रदान

 सरकारी वकील सतीश पाटील यांना ‘समाजभूषण सन्मानपत्र’ प्रदान

पद्मशाली युवाशक्ती, महिला शक्ती व पद्मनादम वाद्यपथकाकडून कार्याचा गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील अ‍ॅड. सतीश पाटील यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व भरीव कार्याबद्दल पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट, पद्मनादम ढोल ताशा वाद्यपथक व पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने ‘समाजभूषण सन्मानपत्र’ व भगवान श्री मार्कंडेय महामुनी यांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना अ‍ॅड. सतीश पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यात आपले योगदान देणे, हीच माझी नेहमी भूमिका राहिली आहे. आपण हा सन्मान करून माझी जबाबदारी वाढवली आहे, त्याला जागण्याचा सदैव प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. नगर जिल्हा व सत्र न्यायालयात मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत हा सन्मान अ‍ॅड. पाटील यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
अ‍ॅड. पाटील यांनी अन्यायाचे निर्दालन करून न्यायाचा विजय करत असताना समाजातील दीन-दुबळ्या, शोषित, वंचित घटकाची बाजू घेताना या घटकांचा न्यायासनावरचा, कायद्यावरचा विश्वास दृढ केला. सर्वसामान्य जनतेची न्यायासाठी होणारी हेळसांड पाहता त्यांनी अगदी अल्प कालावधीत नगर शहरातील गरीब घरातील आमच्या एका अबला समाज भगिनीला न्याय मिळवून दिला, असे श्री. सागर बोगा म्हणाले.
त्यांच्या कार्याची दखल घेत पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टचे योगेश म्याकल यांच्या हस्ते पाटील यांना ‘समाजभूषण‘ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्मात आले. यावेळी सुमित इप्पलपेल्ली, योगेश ताटी, श्रीनिवास इप्पलपेल्ली, दीपक गुंडू, बालाजी वल्लाल, अजय म्याना, अभिजीत आरकल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here