बनावट कोरोना अहवाल; खाजगी हॉस्पिटलमधील लॅबविरोधात गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

बनावट कोरोना अहवाल; खाजगी हॉस्पिटलमधील लॅबविरोधात गुन्हा दाखल

 बनावट कोरोना अहवाल; खाजगी हॉस्पिटलमधील लॅबविरोधात गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील एका खाजगी हॉस्पिटल लॅबने कोरोना तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह म्हणून दिला असायाची असल्याची फिर्याद नगर येथील अशोक खोकराळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली असून हॉस्पिटलशी संबंधित क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरचे प्रभारी अधिकारी, लॅब टेक्निशियन व कर्मचार्‍यांचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खोकराळे यांचे वडील (कै.) बबनराव नारायण खोकराळे (वय-79 वर्ष) यांचे दोन बनावट व खोटे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करुन फिर्यादीची व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केली, असे या तक्रारीत म्हटले आहे.
बबनराव खोकराळे यांना 13 ऑगस्ट 20 रोजी घशात खवखव होत असल्याने पटियाळा हाऊस कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. तेथून त्यांना परस्पर न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोना झाल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानंतर 18 ऑगस्टला त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले गेले व 19 रोजी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर खोकराळे परिवाराने उपचारांची कागदपत्रे काही तज्ज्ञांना दाखवली असता रिपोर्टबाबत शंका आल्याने त्यांनी शासनाकडे तक्रार केली. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने या प्रकरणाची चौकशी केली व उपचार करणार्‍या डॉक्टरांना (कै.) बबनराव खोकराळे यांचा करोना रिपोर्ट दाखवण्यास सांगितला असता तो नंतर सादर करू, असे त्यांनी सांगितल्याने खोकराळे परिवाराचा संशय बळावला व त्यांनी शहरातील सर्व शासकीय कोविड सेंटर येथे बबनराव खोकराळे यांच्या कोरोना रिपोर्टबाबत चौकशी केली असता कोठेही असा रिपोर्ट केला गेला नसल्याचे सांगितले गेले. त्यानंतर एका खाजगी हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिक लॅबमध्ये चौकशी केली असता तेथे बबनराव खोकराळे यांचे सलग दोन दिवस आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट केल्याचे अहवाल मिळाले. त्यावरील फोन नंबरवर चौकशी केली असता ते दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे नंबर होते व त्यांचे ते रिपोर्ट होते. त्या रिपोर्टनुसार त्यांनी कोरोना उपचारही घेतल्याचे समजल्याने (कै.) बबनराव खोकराळे यांचे ते रिपोर्ट नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे क्रस्ना डिग्नोस्टिक लॅबचे अधिकारी, लॅब टेक्निशियन व कर्मचार्‍यांविरुद्ध त्यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment