मराठा उद्योजक लॉबीच्या शहराध्यक्षपदी महेश आठरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

मराठा उद्योजक लॉबीच्या शहराध्यक्षपदी महेश आठरे

 मराठा उद्योजक लॉबीच्या शहराध्यक्षपदी महेश आठरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मराठा उद्योजक लॉबीच्या नगर शहराध्यक्षपदी युवा मराठा उद्योजक महेश आठरे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा केमिस्ट परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. मराठा उद्योजकांच्या संघठनातुन व्यवसायात येणार्‍या समस्या सोडवण्याचा तसेच तरूणांनी व्यवसायाकडे वळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी महेश आठरे यांनी सांगीतले. केमिस्ट व्यावसायिक असलेले महेश आठरे यांच्या या निवडीचा केमिस्ट असोसिएशनला अभिमान असून या माध्यमातुन तरुणांमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचा मानस केमिस्ट सुधीर लांडगे यांनी व्यक्त केला. यावेळी राजेंद्र बेंद्रे, मिलींद क्षीरसागर, सुधाकर बोरुडे, राहुल गोरे, सचिन मोटे, अविनाश साळुंके, प्रताप धुमाळ, महेंद्र राऊत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment