नवीन वर्षात सलग 12 तास 16 विविध सहजयोग प्रशिक्षण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

नवीन वर्षात सलग 12 तास 16 विविध सहजयोग प्रशिक्षण

नवीन वर्षात सलग 12 तास 16 विविध सहजयोग प्रशिक्षण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोविंड 19 ने संपूर्ण जगाला एका व्यासपीठावर आणून उभे केले आणि त्याचे नेतृत्व भारत देश करीत आहे ही गोष्ट अध्यात्मिक क्षेत्रातही निष्पन्न झाले असून या ऑनलाईन नियमित ध्यान साधने मध्ये जगातील 4 लाखा पेक्षा जास्त साधकांनी  प्रतिदिवस आपली उपस्थिती दर्शवली ज्यामध्ये वेगवेगळ्या वयो,गटातील विविध जाती - धर्मातील व विविध देशातील साधकांनी सहभाग घेतला.
श्री माताजी निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट द्वारे  राष्ट्रीय सहजयोग ट्रस्ट , नवी दिल्ली व सहजयोग प्रतिष्ठान, पुणे द्वारे सहजयोग सुवर्ण जयंती उत्सव निमित्त संपूर्ण देशभरामध्ये 16 विविध भारतीय भाषांमध्ये सलग 12 तास ऑनलाईन  कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूतीचा  कार्यक्रम याचे निशुल्क प्रशिक्षण 3 जानेवारी 2021  वार रविवार रोजी सकाळी 9  ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये प्रत्येक सत्र हे 45 मिनिटाचे असून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सलग सोळा भाषांमध्ये ध्यान शिकवले जाणार आहे. सर्वप्रथम पहिले सत्र देववाणी संस्कृत भाषेमध्ये सुरुवात होणार आहे,त्यानंतर हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, सिंधी व इंग्रजी असे एकूण 16 भाषांमध्ये संपूर्ण भारतात एकाचवेळी संपूर्ण भारत देशातील साधक  एकाच वेबसाईटवर ुुु.ीरहरक्षरूेसर.ेीस.ळप या वर ध्यान साधनेचा अनुभव घेऊ शकतील.
सहजयोग नॅशनल ट्रस्ट , नवी दिल्ली चे उपाध्यक्ष श्री दिनेश रॉय यांनी वरील माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात सकाळ-संध्याकाळ ऑनलाइन ध्यानामध्ये शास्त्रीय संगीत व भजन तसेच नवीन साधकांसाठी ध्यान कार्यक्रम व ध्याना मधील गहनता येण्यासाठी नियोजित केलेल्या कार्यशाळेत देश-विदेशातील लाखो साधकांनी ऑनलाईन सहभागी होऊन ध्यान प्रक्रियेचा लाभ घेतला, ज्यामध्ये लाखो लोकांचा सहभाग व पाठपुरावा करत असल्याची माहिती प्राप्त झाली. ज्या आधारे ग्लोबल रेकॉर्ड कमिटी द्वारा सहजयोग संस्था आशिया खंडातील सर्वात जास्त सामूहिकतेत ध्यान करून घेणारी संस्था या नावाने पुरस्कार देण्यात आले. सहजयोग प्रतिष्ठान, पुणे येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार लॉक डाऊन काळामध्ये सुरुवातीस 50 दिवसात यूट्यूब चैनल प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने 82 देशातील 4 लाखापेक्षा अधिक साधक ऑनलाईन सत्रात नियमितपणे सामूहिक ध्यान केलेले आहे. प्रतिष्ठान पुणे यूट्यूब चैनलला लोकांकडून 19 लाख तास  पर्यंत 47 लाख पेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. युट्युब वर ध्यान सत्रात 3 करोड 38 लाख पेक्षा अधिक साधक सहभागी झाल्याची माहिती प्राप्त झाली. फेसबुक पेज इंडिया व सहजयोग फेसबूक माहितीच्या आधारे एकूण 14 लाख लोकांनी माहिती वाचली आणि 82 हजार लोकांनी फेसबुक पेज पाहिले यावरून असे लक्षात आले की, लॉकडाऊन काळामध्ये लोकांनी भय, चिंता व निराशा यामधून बाहेर येण्यासाठी सहजयोग ध्यान पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात केलेला आहे. ही ध्यान साधना संपूर्णपणे विनामूल्य आहे आणि याची पद्धत अत्यंत सरळ व सोपी असून तीच्या प्रभावामुळे प्रत्येक व्यक्ती लगेच आपल्या मध्ये परिवर्तन घडल्याचा अनुभव घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यांना या कार्यक्रमाची माहिती घ्यावयाची आहे त्यांच्यासाठी संपूर्णतः निशुल्क टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800 2700 800 यावर माहीती उपलब्ध आहे अशी माहिती सहजयोग महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री स्वप्नील धायडे यांनी दिली आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण झालेली असताना या परिस्थितीत सहजयोग ध्यान निशुल्क ऑनलाइन कार्यक्रम शहरात ही नाही तर संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांसाठीसाठी फायदेशीर होत  असल्याचे निष्पन्न होत आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराचे जिल्हा समन्वयक श्री सुधीर सरोदे यांनी दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी होणार्‍या ऑनलाइन ध्यान साधने च्या कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूती या  कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा या मध्ये हिंदीत सकाळी 9.45 ते 10.30 वा. व मराठीत सायंकाळी 5.15 ते 6.00  वा. या वेळेत असल्याची माहिती दिली.

No comments:

Post a Comment