अंधःकारातून आध्यात्मरुपी प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

अंधःकारातून आध्यात्मरुपी प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग

 अंधःकारातून आध्यात्मरुपी प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग

रेव्हरंड जे. के. वाघमारे ः अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) चर्चमध्ये कॅन्डल लाईट सर्व्हीस रॅलीचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः समस्त मानवजातीचे तारणहार प्रभू येशू भूतलावर जन्माला आले. त्यावेळी मनुष्य जीवन अंधःकारमय झाले होते. पाप वाढले होते. प्रभु येशूमुळे मनुष्य जीवन अंधःकारातुन मुक्त होऊन प्रकाशमय झाले तसेच पाप मुक्त होऊन सुखमय झाले.  मनुष्य जीवनात एक नवे प्रकाश पर्व सुरु झाले. त्यामुळे दरवर्षी नाताळ सणानंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येला कॅन्डल लाईट सर्व्हिस रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहीती रेव्हरंड जे.के. वाघमारे यांनी दिली.
अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) चर्चमध्ये कॅन्डल लाईट सर्व्हीस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी रेव्हरंड वाघमारे बोलत होते. यावेळी रेव्हरंड सुनिल रणनवरे व ख्रिस्ती बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. रेव्हरंड वाघमारे पुढे म्हणाले की, आजही मानव जीवन प्रकाशमय व सुखमय करण्यासाठी दरवर्षी या कॅन्डल लाईट रॅलीचे आयोजन केले जाते. नाताळनंतर या माध्यमातुन आध्यात्मरुपी प्रकाश सर्व मंडळींपर्यंत पोहोचवला जातो. प्रत्येक मंडळीच्या कुटुंबा पर्यंत वर्षभर हा भक्ती प्रकाश राहावा म्हणून याचे आयोजन केले जाते. या वर्षी कोरोना विषाणूमुळे शासन निर्देशांचे पालन करीत ही रॅली संपूर्ण शहरात न काढता केवळ चर्च परिसरात काढण्यात आली व सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय) सेक्रेटरी मनस्विनी सोंतलें, खजिनदार सॅम्युअल खरात, प्रसन्ना शिंदे, अजित ठोकळ, राहुल थोरात, हर्षल जाधव, शमशोन शिंदे, ऋतिक चांदेकर, पीटर शिंदे, प्रथमेश शिंदे, स्मितिष जाधव, लुकस शिंदे, हर्षल पाटोळे, स्तवन साळवे, अहरव पतरे, मृदुल भोसले, जोएल सूर्यवंशी, सॅम्युअल पिंटो, वैभव साळवे, संदेश लाड, आशिष चांदेकर, स्तवन जाधव, सुधीर जाधव, तन्मय क्षेत्रे, जय वानखेडे, गौरव म्हस्के, आशिष व्हेनोन, तुषार पोळ, तसेच पस्टरेत कमिटी, शाभाथ शाळा, ज्येष्ठ संघ, आणि मंडळीचे सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment