सुनंदाताई पवार यांच्या हस्ते जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या रंग व तत्सम साहित्याचे लोकार्पण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

सुनंदाताई पवार यांच्या हस्ते जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या रंग व तत्सम साहित्याचे लोकार्पण.

सुनंदाताई पवार यांच्या हस्ते जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या  रंग व तत्सम साहित्याचे लोकार्पण.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
जामखेड - जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशन च्या माध्यमातून रंग व तत्सम साहित्याचा लोकार्पण कार्यक्रम सुनंदाताई पवार यांच्या हस्ते संपन्न.

जामखेड शहराने स्वच्छता सर्वेक्षण मध्ये भाग घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व शहरातील मोकळ्या भिंतीला रंगरंगोटी करून त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशन च्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या रंग व तत्सम साहित्याचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
 जामखेड येथील कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशन च्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे ,जामखेड नगर परिषदेचे अभियंता शेळके, महावितरण'चे योगेश कासलीवाल ,पंचायत समिती चे श्री पवार, श्री नागेश विद्यालय चे प्राचार्य हरिभाऊ ढवळे,युवा नेते प्रशांत काका राळेभात ,महेंद्र राळेभात आदी कार्यकर्ते ,महिला व नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनंदाताई पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment