नगर तालुक्यातही आ. लंकेंचा डंका ! या ग्रामपंचायती बिनविरोध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

नगर तालुक्यातही आ. लंकेंचा डंका ! या ग्रामपंचायती बिनविरोध

 नगर तालुक्यातही आ. लंकेंचा डंका !

आकोळनेर, खडकी,घोसपुरी ग्रामपंचायती बिनविरोध

   


नगरी दवंडी


     ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करा व गावासाठी २५ लाखांचा निधी घ्या, या आमदार नीलेश लंके यांच्या आवाहनास पारनेर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत असतानाच आता मतदार संघात असलेल्या नगर तालुक्यातही आ. लंके यांचा डंका वाजतो आहे ! पारनेर तालुक्यातील विविध गांवांच्या बैठका घेतल्यानंतर  आ. लंके यांनी बुधवारी नगर तालुक्यातील विविध गावांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. नगर तालुक्यात मतदारसंघातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका  होत असून त्यापैकी आकोळनेर, खडकी व घोसपुरी येथील ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय आ. लंके यांच्या उपस्थितीत जाहिर केला. दरम्यान २२ पैकी आणखीही काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याचे संकेत मिळाले आहेत.


     गावागावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात. एकाच घरामध्येही अबोला निर्माण होतो. गावांमधील या वादामुळे विकास कामांवर मोठा परिणाम होत असल्याने संघर्ष टाळा, सत्तेचे विकेंद्रीकरण करून सत्तेत सर्वांना संधी द्या. विकास कामांना तात्काळ २५ लाखांचा निधी देतो अशी घोषणा आ. लंके यांनी केली होती. पारनेर तालुक्यात या घोषणेस मोठा प्रतिसाद लाभला. राजकारणात अग्रेसर असलेल्या नगर तालुक्यात आ. लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद मिळणार का ? याची पारनेर तालुक्यात उत्सुकता होती. मात्र नगर तालुक्यातही आ. लंके यांच्या पॅटर्नचाच डंका वाजत असल्याचे चित्र बुधवारी पार पडलेल्या विविध बैठकांमधून दिसून आले. अर्ज दाखल करेपर्यंत २२ पैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


खडकी ५० वर्षानंतर होणार बिनविरोध !


     नगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या बैठकांमध्ये प्रविण कोठूळे, शरद कोठूळे, पत्रकार जितेंद्र निकम, सरपंच अशोक कोठूळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनिल कोठूळे, मनेश भोसले, सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव भोसले, राजू  कोठूळे, विजय काळे हे उपस्थित होते. आ. लंके यांच्या आवाहनानुसार बिनविरोध निवडणूक झाल्यास गावातील वाद, तंटे, भावकीतील संघर्ष होणार नाहीत. त् त्यास खडकी ग्रामस्थांनी प्रतिसाद देत ५० वर्षात प्रथमच बिनविरोध निवडणूकीचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment