दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वेटर व मास्क वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वेटर व मास्क वाटप

 दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वेटर व मास्क वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी या शाळेतील दत्तू गांगुर्डे यांची चार मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली आहेत. त्यांना वेळोवेळी विविध प्रकारचे  शैक्षणिक साहित्य तुकाराम अडसूळ यांनी वाटप केले आहे. त्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटर व कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्क वाटप तुकाराम अडसूळ यांनी नुकतेच केले.
पहिलीमधील ओम दत्तू गांगुर्डे ,तिसरीमधील राहुल दत्तू गांगुर्डे ,चौथीमधील महेश दत्तू गांगुर्डे ,अक्षदा दत्तू गांगुर्डे या विद्यार्थ्यांना हे स्वेटर व मास्क वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे पालक मजुरी करतात. अत्यंत बिकट परिस्थितीतूष हे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते.या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी तुकाराम अडसूळ हे त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण देतात.याबद्दल तुकाराम अडसूळ यांचे गावातील लोकांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment