नगर मनमाड हायवे वर दरोड्याच्या हेतूने थांबलेल्या 4 जणांबरोबर पोलीसांनी केले असे काही - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

नगर मनमाड हायवे वर दरोड्याच्या हेतूने थांबलेल्या 4 जणांबरोबर पोलीसांनी केले असे काही

 नगर मनमाड हायवे वर दरोड्याच्या हेतूने थांबलेल्या  4 जणांबरोबर पोलीसांनी केले असे काहीनगरी  दवंडी

राहुरी  - नगर मनमाड  राज्य मार्गावरील  गुहा पाटाच्या पुढील काटवणा मध्ये काही इसम संशयित रित्या दरोडा टाकण्याचा उद्देशाने  फिरत असल्याची  खबर  मिळाल्यावरून कोल्हार फाट्याचे अलीकडे दबा धरून बसून खात्री  करुन  घेतली त्यावेळी 5ते 7इसम एका अशोक लेलँड पिकअपच्या आडोश्याला उभे राहून रस्त्याने जाणारे येणारे वाहनांना हातवारे करुन थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस पथक व पंचाची खात्री होताच संशयित रित्या उभे असलेल्या 4जणांना पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले. तर 3जणांचा पाठलाग केला असता ते अंधाराचा फायदा घेऊन  पळून गेले.सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ह्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी  संदीप मिटके  ह्यांचे सूचनेवरून पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे ह्यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक  गणेश शेळके पोहेकाँ अण्णासाहेब चव्हाण, संजय राठोड,पालवे,खेमनर, प्रवीण अहिरे ह्यांनी सदर कामगिरी केली.    सदर  इसमांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव गाव पत्ता  सांगितलं असून त्यात गणेश बाळासाहेब शेंडगे वय 21रा चिंचोली फाटा, किरण उर्फ विकी बबन थोरात वय 25 चिंचोली फाटा, आकाश बाबासाहेब वाकडे 22रा गुहा पाट, नवनाथ नंदकुमार पाचारणे 20रा डिग्रस अशी नावे असून सदर इसमांकडे एक अशोक लेलॅड कंपनीची मालवाहू गाडी नंबर MH17BT4533ही गाडी  तसेच दरोडा घालण्यासाठी  लागणारे साहित्य मिळून आले. त्यांचेकडून  फरार झालेल्या आरोपींची  नावे समजली असून त्यात अभी अशोक जाधव रा कोल्हार खुर्द, प्रकाश भोसले रा  चिंचोली फाटा, विधिसंघर्ष ग्रस्त बालक असे असल्याचे सांगितले. 

सदर इसमाविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हा रजि नं 2066/2020भादवी कलम 399, 34नव्ये गुन्हा दाखल केला असून  आरोपीना  आज न्यायालया पुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 18डिसेंबर 2020अखेर पोलीस कोठडी दिली आहे. सदर आरोपींकडे सायबर सेल श्रीरामपूर येथील हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोडगे, प्रमोद जाधव फरकान शेख, आकाश बैराट उपविभागीय पोलीस श्रीरामपूर अधिकारी यांचे पथकातील सुनील शिंदे रवींद्र मेढे ह्यांनी विचारपूस केली असता त्यांनी खालील ठिकाणी गुन्हा केल्याचे कबूल केले. 2नोव्हेंबर 2020रोजी चिंचोली फाटा येथील योगेंश मिठूलाल मुथा 38रा कोल्हार बु ता राहाता ह्यांचे कांद्याचे शेडची  जाळी कापून 95000रुपये किंमतीचा100 गोणी कांदा लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला. याबाबत राहुरी पोलीस स्टेशन मध्ये  गुन्हा  दाखल आहे.वरील आरोपी विरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे  दाखल  असून त्याबाबत चौकशी सुरु आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here