कोरोनाचे संकट नसते तर शहरासाठी 20कोटी रुपयाचा निधी निश्चित आणला असता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

कोरोनाचे संकट नसते तर शहरासाठी 20कोटी रुपयाचा निधी निश्चित आणला असता

 कोरोनाचे  संकट नसते तर शहरासाठी 20कोटी रुपयाचा निधी निश्चित आणला असता



नगरी दवंडी


राहुरी - नगरपालिकेचा साडे तीन वर्ष नगराध्यक्ष असताना राज्यात विरोधी पक्षाचे सरकार  सत्तेवर असल्याने त्याकाळात निधी मिळत नव्हता पण आता नगराध्यक्ष नसताना सुद्धागावचा आमदार नगरविकास मंत्री म्हणून 8कोटींचा निधी आणला जर  कोरोनाचे  संकट नसते तर शहरासाठी 20कोटी रुपयाचा निधी निश्चित  आणला असताअसे  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या प्रभाग 1मधील येवले आखाडा व दत्त नगर येथील विविध  विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ना तनपुरे  बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ अनिता पोपळघट होत्या.यावेळी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी मुख्याधिकारी  डॉ श्रीनिवास कुरे उपस्थित होते.

राज्यमंत्री तनपुरे आपल्या भाषणात म्हणाले की।  शहरा साठी लवकरच 29कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम सुरु होणार असून त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याने  मार्गी लागली फक्त निवडणुकीत मते घेण्यासाठी मंजुरी आणली नाही.

यावेळी नगरसेवक नंदकुमार तनपुरे प्रकाश भुजाडी अनील कासार सौ ज्योती तनपुरे सौ नंदाताई उंडे विलास तनपुरे अशोक आहेर बाळासाहेब उंडे विजय करपे दिलीप चौधरी अयूब पठाण अर्शद पठाण बाबासाहेब येवले आबासाहेब शेटे  बाळासाहेब जाधव  सुधाकर येवले गंगाधर जाधव विजय येवले महेश येवले गणेश ढेरे संदीप सोनवणे अब्दुल शेख बाबासाहेब मुलमुळे सतीश मोरे सौ कांचन सोनवणे सौ योगिता मुलमुळे सौ वंदना सोनवणे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment