दिल्ली ते मुंबई जी टू जी राईडसाठी जस्मित वधवा रवाना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

दिल्ली ते मुंबई जी टू जी राईडसाठी जस्मित वधवा रवाना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा..

 दिल्ली ते मुंबई जी टू जी राईडसाठी जस्मित वधवा रवाना

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा..नगरी दवंडी


अहमदनगर - दिल्ली ते मुंबईदरम्यान 19 ते 24 डिसेंबरला होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडमध्ये नगरचे उद्योजक जस्मित वधवा यांनी सहभाग नोंदविला आहे. या राईडमध्ये संपूर्ण देशातून फक्त 40 जणांनी सहभाग घेतला असून, वधवा अहमदनगरचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रवासासाठी नगरमधून रवाना होणारे वधवा यांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मेजर गौरव शर्मा, मेजर आर.एस. जोधा, हरजितसिंह वधवा, धनेश खत्ती, अतुल डागा, प्रीतम भागवानी, दिनेश भाटिया, अमित आंदोत्रा, महेश भाटे, मनोज चोपडा, राहुल ओझा, महेश गोपालकृष्णन, किशोर फिरोदिया, प्रदीप पेंढारे, आकाश भन्साळी, श्याम वाघुंबरे, महेश चव्हाण, डॉ. संजय असनानी, प्रशांत मुनोत आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्ली ते मुंबईदरम्यान होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडची माहिती घेऊन सायकल चालविण्याचा आनंद घेतला. जी-टू-जी सायकल राईडमध्ये 1 हजार 460 किलोमीटरचे अंतर पाच दिवसांमध्ये सायकलवर पूर्ण केले जाणार आहे. जी-टू-जी म्हणजे दिल्ली येथील इंडिया गेट ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाचा, असा सायकलप्रवास असणार आहे. यात दररोज 280 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान नगरचे जस्मित वधवा यांच्यासमोर असणार आहे. शून्य डिग्री ते 40 डिग्री तापमान, वाहतूक, रस्ता या सर्व बाबींचा त्यांना सामना करावा लागणार आहे.

अभियंता असलेले जस्मित यांचा या सायकल राईडमध्ये गरिबांसाठी ना नफा-ना तोटा तत्त्वावर मेडिकलचे दालन सुरू करण्याचा संकल्प केला आहे. जस्मित वधवा यांनी ही राईड यशस्वी पणे पूर्ण करणार असल्याचा आत्मविश्‍वास व्यक्त करीत नगरला आणखी एक मनाचा तुरा रोवनार असल्याचे मत व्यक्त केले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि तिरंगा फाऊंडेशने त्यांना या राईडसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here