मंदिरे खुली झाल्याने जनतेच्या मनात आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले- महेंद्र गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 19, 2020

मंदिरे खुली झाल्याने जनतेच्या मनात आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले- महेंद्र गंधे

 मंदिरे खुली झाल्याने जनतेच्या मनात आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले- महेंद्र गंधे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मार्च 2020 पासून संपूर्ण जगात कोरोना वायरसचा हाहाकारला सुरुवात झाली. त्या अनुषंगाने 3 महिने भारत लॉक डाऊन करण्यात आले. अजून कोरोना संपला नाही त्यामुळे धार्मिक स्थळावर गर्दी झाली आणि पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूनये म्हणून राज्य शासन मंदिरे उघडत नव्हती.मंदिर उघडण्यासाठी भाजप आणि नागरिकांनी आंदोलने केली त्यामुळे राज्य सरकारने पाडव्याच्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले.त्यामुळे जनतेच्या मनात आणि वातावरणात चैतन्य निर्माण झाले. असे प्रतिपादन भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे यांनी केले.
राज्य शासनाने पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली केल्याने भाजपच्या वतीने प्रोफेसर चौक येथील रेणुकामाता मंदिरात महाआरती करून पेढे वाटण्यात आले. यावेळी भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, भरत सुरतवाला,तुषार पोटे,विवेक नाईक, बाळासाहेब गायकवाड,प्रा. मधुसूदन मुळे,डॉ.प्रभाकर प्रताप, मनिष खिस्ती, सिद्धेश्वर नाकाडे, चिन्मय खिस्ती, अभिषेक वराळे, पराग दीक्षित, तेजस धुळेकर, मंदार गंधे, हुजेफा शेख, ऋग्वेद गंधे,सुजित खरमाळे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भैय्या गंधे पुढे म्हणाले भारताच्या संस्कृती मध्ये मंदिर हे मुख्य आहे. सर्वजण दररोजच्या नेमावलीत सकाळी घरातून बाहेर पडल्यावर मंदिरात देवांचे दर्शन घेवून आपल्या कामावर जातात. प्रत्येक सणाला कुटुंबासोबत मंदिरात जाऊन प्रार्थना करतात हे जीवनाचे सत्य आहे. मंदिर खुले झाल्याने पहिल्या सारखे दिवस सुरु झाले आहेत. पण सर्वांनी हे लक्षात ठेवावे अजून कोरोनावर औषध आलेले नाही त्यामुळे सर्व नियमांचे पालन आवशक आहेत. नियमांचे पालन करून स्वता सुरक्षित रहा दुसर्‍याला सुरक्षित ठेवा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here