पाडळी रांजणगांव सेवा संस्थेच्यावतीने लाभांश वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 19, 2020

पाडळी रांजणगांव सेवा संस्थेच्यावतीने लाभांश वाटप

 पाडळी रांजणगांव सेवा संस्थेच्यावतीने लाभांश वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने 10 टक्के लाभांश जाहीर केला असून लाभांश वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांच्या शुभहस्ते व चेअरमन सौ आशाबाई राधु करंजुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी बोलताना विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले की सुमारे 35 वर्षानंतर  लाभांश मिळणार असल्याने यंदा सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत  सभासदांना लाभांश मिळवून देण्याचे आश्वासन ग्रामविकास मंडळाने पूर्ण केले याबद्दल संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाचे आभार मानले.
यावेळी पाडळी रांजणगाव चे युवा नेते तथा संचालक  डी. बी.करंजुले,व्हा चेअरमन मंजुळा कळमकर, संचालक दादाभाऊ घावटे,अरुण उबाळे,वसंत जाधव,किरण साठे,ईश्वर साठे,नवनाथ उघडे, दत्तात्रय उबाळे,ताराचंद करंजुले,भास्कर कळमकर, विठ्ठल उबाळे यांच्यासह जेष्ठ सभासद कचरू (अण्णा) उबाळे,भास्कर उबाळे,भाऊसाहेब उबाळे सदाशिव साठे,विठ्ठल साठे,भागाजी जाधव,पंढरीनाथ उघडे,गणपत औटी,राजू कळमकर, शहाजी कळमकर, रामदास कळमकर, भानुदास कळमकर,प्रभाकर करंजुले,सावळेराम साठे,भास्कर पाटील,संजय शेलार ,अशोक साठे, सुभाष पाटिल,शिवाजी करंजुले, लतेश करंजुले,परसराम साठे,रखमाजी उबाळे,संस्थेचे सचिव अविनाश ठुबे,सहसचिव बापू यादव आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here