बर्गेवाडी येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 26, 2020

बर्गेवाडी येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन

 बर्गेवाडी येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः बर्गेवाडी येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले,
कर्जत नगर पंचायत अंतर्गत जुन्या प्रभाग क्रमांक 2 या बर्गेवाडी येथील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके यांच्या अथक परिश्रमातून नगर पंचायतचा कार्यकाळ संपत आल्याच्या अंतिम टप्प्यातही करण्यात आले. कर्जत शहरातील बर्गेवाडी येथे अत्यंत सुंदर व स्वच्छ परिसर करण्यात आला असून कर्जत शहरातील बारामती अशी ओळख निर्माण केलेल्या या प्रभागाचे नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी अनेक विकास कामे केली आहेत आज नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलूमे, व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आलेल्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास नगरसेविका उषा म्हेत्रे राऊत, हर्षदा काळदाते यांचे सह माजी उपसभापती कांताबाई नेटके मुळे मॅडम, पिसाळ मॅडम याचे सह कुशाभाऊ नेटके व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here