आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 26, 2020

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

 जामखेड नगरपरिषदेच्या रखडलेल्या घरकुलाचे 11 कोटींचे अनुदान वर्ग

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पाचे एकूण 933 लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान अखेर राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने नगर परिषदेच्या खात्यात वर्ग झाले आहे. त्यामुळे अर्धवट बांधकाम आसलेल्या लाभार्थीच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ही दोनवर्षा पुर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. या घरकुल योजनेत पात्र लाभार्थींचे घराचे बांधकाम चालु आहे तर काहींनी उसनवारी करुन आपल्या घरांची कामे पुर्ण केली होती. यामध्ये गोरगरीब, हातावर काम करणारे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र घरकुलाचा 90 हजारांचा शेवटचा हप्ता मिळाला नसल्याचे आनेक जण आर्थिक संकटात सापडले तसेच पैशामुळे आनेकांच्या घराचे अर्धवट काम करुन बंद पडली आहेत. दोन वर्षांपासून मागणी करुनही पैसै मिळत नसल्याने लाभार्थी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. जामखेड नगर परिषदेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेनंतर्ग एकूण 933 लाभार्थी असुन या प्रकल्पाचे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित होते.रखडलेल्या अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात आ. रोहित पवारांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी याबाबत चर्चा केली. 19 नोव्हेंबर रोजी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे प्रलंबित अनुदानासाठी आ.पवारांनी पत्रव्यवहार केला व रखडलेले हे अनुदान तात्काळ वितरित होण्याबाबत पाठपुरावाही केला. गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिवांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रलंबित अनुदान वितरित करण्याबाबत संबंधितांना आदेश दिले.दि.24 नोव्हेंबर रोजी माननीय लेखाधिकारी,वित्त नियंत्रण,गृहनिर्माण भवन, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या पत्रान्वये जामखेड नगर परिषद येथील 933 लाभार्थ्यांच्या घरकुल प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्याचे 11 कोटी 19 लक्ष 60 हजार एवढे अनुदान जामखेड नगर परिषदेच्या खात्यामध्ये नुकतेच वितरित करण्यात आले आहेत.(झ.ऋ.च.ड)र्झीलश्रळल ऋळपरपलळरश्र चरपरसशाशपीं डूीींशा म्हणजेच ’सार्वजनिक वित्त व्यवस्थापण प्रणाली’द्वारे हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.रखडलेल्या या अनुदानाचे संबंधित लाभार्थ्यांना लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here