शासकीय कार्यक्रमात आ. रोहित पवारांचे नाव का टाळले? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 26, 2020

शासकीय कार्यक्रमात आ. रोहित पवारांचे नाव का टाळले?

 शासकीय कार्यक्रमात आ. रोहित पवारांचे नाव का टाळले?

राष्ट्रवादीचे सुनील शेलार यांनी उपस्थित केला प्रश्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः कर्जत नगर पंचायतीने केला समर्थ गार्डनचा उद्घाटन कार्यक्रम शासकीय असून ही त्यात आ रोहित पवार यांचे नाव टाळने हा जनतेचा अपमान असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी कर्जत नगर पंचायतचे सर्वेसर्वा नामदेवराव राऊत यांच्यावर टीका करत पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत.
      कर्जत येथे काल दि 23 नोव्हे रोजी समर्थ गार्डनचे खा. सुजय विखे यांच्या हस्ते व माजी मंत्री प्रा. राम शिंदेच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सम्पन्न झाले या कार्यक्रमाच्या कोनशिलेवर व कार्यक्रम पत्रिकेत कर्जत तालुक्याचे लोकप्रतिनिधी  आ. रोहित पवार यांचे नाव न टाकता शासकीय प्रोटोकॉल पाळलेला नसून नामदेव राऊत यांना आ. पवार यांच्या नावाची ऍलर्जी आहे का? असा प्रश्न उपस्थित करत या प्रकाराचा निषेध केेला. याचा खुलासा नामदेव राऊत व मुख्याधिकारी  यांनी करावा असेही आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्यावर भष्ट्राचाराचे ही आरोप केले यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, तालुका उपाध्यक्ष अण्णा महारनवर, सतीश पाटील, सचिन सोनमाळी, शहराध्यक्ष राहुल नेटके, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक झारेकरी, नाथा गोरे, जाकीर सय्यद, आदी उपस्थित होते.
      राऊत यांना कार्यकाळ संपताना अर्धवट कामाचे उद्घाटन करण्याची घाई असते ते शासकीय कामाचा आपल्या राजकारणासाठी वापर करतात, राऊत यांनी या कार्यक्रमात प्रा राम शिंदे यांनी 99 कोटी निधी दिल्याचे सांगितले तर त्यानंतर स्वतः माजी मंत्री प्रा शिंदे यांनी आपण 126 कोटी रुपये निधी दिल्याचे म्हटले यावर आकड्यामधील तफावत दाखवत 26 कोटी कोठे गेले असा प्रश्न उपस्थित केला. फिल्टर पाण्याचा वापर कर्जतच्या जनतेला होत नाही स्वतः राऊत यांचे फोटो लावून शहरात पाणी पुरवठा केला जात आहे, तसेच नगरपंचायतीच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी स्वतःला पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी टेंडर का काढले आहे याचे सह विद्यमान सदस्यांपैकी किती नगरसेवक हे नळाचे पाणी पितात याचा जाहीर खुलासा करावा असे म्हटले आहे. खोटे बोल पण रेटून बोल अशी राऊत यांची कार्यपद्धती असून आलेल्या सर्व निधीची कामे स्वतः वेगवेगळ्या एजन्सीद्वारे केली असून या कामाची गुणवत्ता कशी आहे हे कर्जतकरांनी पाहिले आहे,  स्मशानभुमी हे फिरण्याचे ठिकाण आहे का असा प्रश्न उपस्थित करत तसे असेल तर गार्डनवर खर्च का केला असा प्रश्न उपस्थित करत आगामी काळात रोहित दादा पवार हे  नियोजनबद्ध पद्धतीने नगरपंचायतीची निवडणूक लढविणार असल्याकारणाने राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे त्यामुळे अपूर्ण कामाचे उद्घाटन करण्यात ते दंग आहेत असेही पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment