कार्यालयातील सर्व्हर स्पीड गायब, तलाठी हैराण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

कार्यालयातील सर्व्हर स्पीड गायब, तलाठी हैराण

 कार्यालयातील सर्व्हर स्पीड गायब, तलाठी हैराण

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः दोन महिन्यांपासून तलाठी कार्यालय अवलंबून आसलेल्या कॉप्म्प्यूटर च्या सर्व्हर चा स्पीड गायप झाल्याने तलाठी व मंडल आधिकाऱी चांगलेच हैराण झाले आहेत.  कार्यालयात येणार्‍या खातेदार व कर्मचार्‍यांमध्ये वाद देखील होताना दिसुन येत आहे. त्यामुळे सर्व्हर स्पीड ची समस्या वरीष्ठ कार्यालयातून सोडवण्यात यावी अशी मागणी जामखेड तालुका तलाठी संघाने केली आहे.
   जामखेड तालुका तलाठी संघ व मंडल आधिकाऱी यांनी नुकतेच तहसीलदार यांना निवेदन देऊन वरीष्ठ कार्यालयातून समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. सर्व्हर ला स्पीड नसल्याने गेल्या दोन महीन्यांपासून तलाठी यांना आडचणीत येत आहेत, सर्व्हर रोज सकाळी, 10:30 ते 5 या वेळेत बंद असतो, कधी कधी स्पीड देखील येत नाही, त्यामुळे कार्यालयात येणार्‍या शेतकरी खातेदार यांना 712 काढुन देण्यास आडचणी निर्माण होत आहेत. तसेच फेरफार संबंधित कामे करणे शक्य होत नाही. दररोज सर्व्हर डाऊन चे उत्तर एकुण घेण्याच्या मनस्थितीत खातेदार राहीले नाहीत. खातेदार व तलाठ्यांनमध्ये या मुळे आनेक वेळा वाद निर्माण होत आहेत. परीणामी तलाठी व मंडल आधिकाऱी हे मानसिक तनावाखाली सापडले आहेत. कार्यालयातील ई फेरफार संबधित कामकाज हे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. त्यामुळे या सर्व्हर स्पीड बाबत वरीष्ठ कार्यालयात तात्काळ कळवुन याची कायमस्वरूपी समस्या सोडवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देता वेळी जामखेड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस.के. कारंडे उपाध्यक्ष एस. व्ही. कुटे, सरचिटणीस व्ही.व्ही मोराळे सह तालुक्यातील तलाठी व मंडल आधिकाऱी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment