सोनई पोलिस ठाण्याचे कर्पे यांनी दिला सतर्कतेचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 24, 2020

सोनई पोलिस ठाण्याचे कर्पे यांनी दिला सतर्कतेचा इशारा

 सोनई पोलिस ठाण्याचे कर्पे यांनी दिला सतर्कतेचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

माका ः नेवासे तालुक्यातील सोनई पोलिस ठाण्याचे रामचंद्र कर्पे यांनी हद्दीतील गावोगावी ग्रामस्थ, तंटामुक्ती अध्यक्ष, बँक मॅनेजर,सराफदुकानदार,पोलिसपाटील,पत्रकार,ग्रामस्थांच्या भेटी घेवून अडचणीबाबत माहिती घेत,सावधगिरी बाळगावी,याविषयी मार्गदर्शन केले. याबाबत असे,सध्यातरी सोनई हद्दीत चोरयांचे प्रणाम वाढले आहे,संबंधितांनी काही अडचणी येताच दूरध्वनीने तात्कळ  संपर्क करावा, काही प्रश्न गावपातळीवर तंटामुक्ती समिती मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करावा,न सुटलयास त्वरीत ठाण्यात कळवावे.बँकेतील कर्मचारी वर्गाने सि.सि.टि.कॅमेरे बसवुन याबाबत माहिती देवून सतर्क रहावे अडचणी येताच ठाण्यात माहिती द्यावी.पेट्रलींग सेवा कायम चालू राहील गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करुन सावधगिरीची भुमिका घ्यावी.तसेच सतर्क रहावे.याबाबत कर्पे यांनी मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी माका से.सह.सो.चे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष खंडुभाऊ लोंढे,व्हा.चेअरमन कामकज पालवे,माजी पोलिसपाटील किसन भानगुडे,रासपचे नेवासे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे,पोलिसपाटील अशोक वाघमोडे,महाराष्ट्र बँक शाखाधीकारी सौम्यरंजन महापात्र,ए.डी.सी.सी.बँकचे भारत शेंडगे,से.सह.सो.चे दिगंबर शिंदे,बाबा काळुसे, सराफ दुकानदार संदीप वर्मा,अर्थदिप मलटीस्टेट मॅनेजर सतिष वाकडे,किसान कृषी सेवाचे प्रविण शिंदे,ग्रामस्थ राजु पालवे,रामा शिंदे,गोकुळ लोंढे,शहादेव लोंढे,विष्णू मदने, पोलिस ठाण्याचे पो.हेड.कॉ.दहिफळे,सचीन ठोंबरे,सुनील ढोले,ज्ञानेश्वर आघाव यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here