स्वातंत्र्य समता बंधुत्व हाच संविधानाचा पाया- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 26, 2020

स्वातंत्र्य समता बंधुत्व हाच संविधानाचा पाया- आ. जगताप

 आज संविधान दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन.

स्वातंत्र्य समता बंधुत्व हाच संविधानाचा पाया- आ. जगताप


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः स्वातंत्र्य समता व बंधुत्व हेच बाबासाहेबांच्या संविधानाचा पाया आहे त्यांनी देश अखंड धर्मनिरपेक्ष व एकात्मता राहण्यासाठी संविधानाची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
      संविधान दिनानिमित्त शिव फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाचे वाचन करण्यात आले तर भीम स्मरणाचे पठण करण्यात आले व आमदार संग्राम जगताप यांचा शिव फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने सविधान देऊन सत्कार करण्यात आला.
 यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, उबेद शेख, जालिंदर बोरुडे, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, संध्या मेढे, सिद्धार्थ आढाव, विकी साठे, समीर भिंगारदिवे, मोना विधाते, महेश आठवले, राजीव दिवटे, विकी तिवारी, रोहित केदारे, येशुदास वाघमारे, दीपक सरोदे, प्रकाश वाघमारे, नितीन घोडके, वैभव जाधव आदी उपस्थित होते. सुरेश बनसोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनविताना घेतलेल्या परिश्रमाचे कथन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here