गोविंदबन कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांचा ओघ सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 27, 2020

गोविंदबन कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांचा ओघ सुरू

 गोविंदबन कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांचा ओघ सुरू


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः गोविंदबन कृषी पर्यटन केंद्राचे कोरेगाव येथे आज डॉ. सोनवणे, संचालक, मॅक्स केअर हॉस्पिटल यांच्या शुभहस्ते उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला . शहरी भागातील पर्यटका करिता हे पर्यटन केंद्र आकर्षणाचा केन्द्रबिन्दु ठरत आहे.
हुरडा पार्टी केन्द्र म्हणून दोन वर्षापुर्वी उदयास आलेले हे केन्द्र आज ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले असून,आता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडे अधिकृत रित्या नोन्दणी झालेले श्रीगोंदा तालुक्यातील प्रथमच आणि एकमेव ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र आहे. गुलाबी थंडी मधील निसर्ग रम्य वातावरण, गरमा गरम हुरडा, शेंगदाणा चटणी, तिळ चटणी याच्या जोडीलाच वैविध्य पुर्ण गावरान बाज असणारे चुलीवरील खाद्यपदार्थ, ऊसाचा ताजा रस, बैलगाडी व घोडागाडी मधुन सफर,लहान मुलांना खेळण्यासाठी भोवरा,विट्टीदान्डी, गोट्या,लगोर बरोबर विविध खेळणी, क्रिकेट, वॉलीबॉल या खेळाची मैदाने , विविध भाजीपाला व फळ पिकांचे प्लॉट ,तसेच सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या कडधान्य,डाळी,चटण्या ,भाजीपाला-फळे यांचे शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवरील थेट विक्री केन्द्र आणि या जोडीला या केंद्राचे चालक बाळासाहेब मोहारे, दादासाहेब साबळे व त्यांच्या कुटुंबियाचे आदरातिथ्य हे या ठिकाणचे विशेष.

No comments:

Post a Comment