सेनेच्या ठिय्या आंदोलनानंतर बोल्हेगाव रस्त्याचे काम सुरू.
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्र.7 मधील बोल्हेगांव परिसरातील डांबरी व सिमेंटच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी व पदाधिकार्यांनी काल दुपारी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याची दखल घेत महापालिकेने रस्त्याचे काम सुरू केले आहे. या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक मदन आढाव, अशोक बडे, निलेश भाकरे यांनी सहभाग घेतला. जो पर्यंत प्रत्यक्ष काम सुरु होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला होता.यावेळी माहिती देताना नगरसेवक मदन आढाव म्हणाले, या रस्त्याच्या कामासाठी 1 महिन्यापूर्वी आयुक्तांना पत्र दिले होते. तरीही काम न झाल्याने 15 दिवसांपूर्वी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या दालनात डोक्याला पट्टी व हाताला बॅण्डेज बांधून आंदोलन केले.
No comments:
Post a Comment