ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना होणार मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 28, 2020

ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना होणार मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान

 घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी रविवारपासून धनादेश स्विकारले जाणार

ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना होणार मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून उभे राहत असलेल्या प्रकल्पाचे धनादेश रविवार दि.29 नोव्हेंबर रोजी स्विकारले जाणार आहेत. तर वंचितांची प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
     घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात 1 गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होत आहे. सदर प्रकल्पात 231 घरे उभारण्यासाठी प्रत्येकी एक गुठ्याचे प्लॉट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जागा घेऊ इच्छिणार्या घरकुल वंचितांचे धनादेश या रविवार पासून स्विकारले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा देत असतात. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कटिबध्द असलेले ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान केले जाणार आहे. लेखक व कोशागार अधिकारी महेश घोडके यांच्या हस्ते हा सन्मान पत्रकारांना प्रदान केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment