बोल्हेगावातील लॉटवर छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 24, 2020

बोल्हेगावातील लॉटवर छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

 बोल्हेगावातील लॉटवर छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरात एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसी पोलिसांनी बोल्हेगावातील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. दोन तरूणीची सुटका करत एकाला अटक केली आहे.
तर दोघे पसार झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजचा मालक सिद्धेश्वर कटके, प्रमोद शिवाजी त्रिंब्यके (रा. मार्केटयार्ड, नगर) व सुधीर भालेराव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. पोलीस नाईक परशुराम नाकाडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रमोद त्रिंब्यके याला अटक केली आहे. बोल्हेगावातील गणपती चौकात सिद्धेश्वर कटके याच्या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपअधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. बोरसे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक पाठक व कर्मचारी यांनी कटके याच्या लॉजवर छापा टाकला. यावेळी प्रमोद त्रिंब्यके मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. तर दोन तरूणीची सुटका केली. छापा पडताच लॉजचा मालक कटके व भालेराव पसार झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here