आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्ता पॅचिंग कामास सुरुवात! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 24, 2020

आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्ता पॅचिंग कामास सुरुवात!

 आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्ता पॅचिंग कामास सुरुवात!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः बोल्हेगाव नागापूर येथील प्रभाग क्र.7 मधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डयांचे पॅचिंग करण्याच्या मागणीचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कुमार वाकळे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना स्मरणपत्र दिले. सदर रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा देताच महापौर वाकळे यांनी तातडीने ठेकेदारास रस्त्यावरील पॅचिंग करण्याचे आदेश दिले.
    बोल्हेगाव नागापूर येथील प्रभाग क्र. 7 परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याची पाऊसामुळे मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडलेले आहे. यामध्ये मुख्यत: बोल्हेगाव गावठाण जिल्हा परिषद शाळा ते केशव कॉर्नर ते अर्जुन सोनवणे ते शंभूराजे चौक ते गणेश चौक पर्यंतचा रस्ता, हॉटेल चैतन्य क्लासिक ते आंबेडकर चौक ते राजमुद्रा चौक ते श्रीराम चौक ते विशाल हनुमान ते गांधीनगर निंबळक रस्त्यापर्यंतचा रोड, बालाजी नगर चौक ते भगवान बाबा चौक ते माहेश्वरी किराणा दुकान ते सचिन गांगर्डे यांच्या घरापर्यंतचा रोड, धनंजय वाघ ते चंद्रशेखर वाघ घर ते एकनाथ वैराळ माहेश्वरी किराणा दुकाना पर्यंतचा रोड, गणेश चौक ते ज्ञानेश्वर मंदिर ते आंबेडकर चौक रोड, कोलते घर ते चंदूशेठ गवांदे घर ते डोळस घर ते भगवान बाबा चौक पर्यंतचा रोड, श्रीराम चौक ते खंडागळे मामा घर ते तिरंगा प्रिंटिंग प्रेस ते मोहारी मामा यांच्या घरापर्यंतच्या रोडवरील लहान-मोठे खड्डयांचे पॅचिंग करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात 28 सप्टेंबरला निवेदन देण्यात आले होते. तर या प्रश्नी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.
बोल्हेगाव नागापूर येथील प्रभाग क्र.7 मधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डयांचे पॅचिंग करण्याचे ठेकेदार व संबंधीत अधिकार्यांना त्वरीत आदेश द्यावे. अन्यथा येत्या आठ दिवसात सदर रस्ता पॅचिंगचे काम सुरु न झाल्यास राष्ट्रवादीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्मरणपत्राद्वारे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कुमार वाकळे यांनी दिला होता या इशार्‍यानंतरच महापौरांनी पॅचिंग कामाचे आदेश दिले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र कातोरे, गणेश भोसले, नितीन बारस्कर, रमेश वाकळे, सचिन गांगर्डे, प्रशांत शिरसाठ, सनी वाकळे, दशरथ वाकळे, गौतम कापडे, नवनाथ कोलते, नामदेव कापडे, बिपिन काटे, सावळेराम कापडे, अरुण कातोरे, दीपक दौंड, निलेश ढगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here