लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजवले

 लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजवले


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः गुंडेगाव ते नगर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आसून गुंडेगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून अनेक खड्डे जेसीबी च्या सहाय्याने बुजवण्यात आले आहे.
    पावसामुळे अंतर्गत रस्त्यांसह काही मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ता असा प्रश्न गुंडेगाव ग्रामस्थांना  पडला होता . खड्डे तयार झाल्यानंतर त्यामुळे अपघात  होतात. त्यामुळे अनेक जण जायबंदीदेखील झाले आहेत. वेळोवेळी जेष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांनी  सार्वजनिक  बांधकाम विभागाकडे तक्रारी देवून सुद्धा  खड्डे  मुरूम टाकून बुजवले नसून शेवटी गुंडेगाव ग्रामस्थांच्या   लोकसभागातून धोकादायक पुलावरील खड्डे मुरमीकरण केले आहेत  , अनेक  ठिकाणी खड्डे पडले आसून  रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात  खडी निघून गेली आहे त्यामुळे  डांबरी मलमपट्ट्या निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. येणार्‍या दिवसांत हे खड्डे बुजवले नाही, तर सतत ये-जा करणार्‍या वाहनांमुळे हे खड्डे मोठा आकार घेतील. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. अनेक  रस्त्यांला खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना, वाहनचालकांना मोठ्या कसरतीने रस्त्यावरून ये-जा शेतकरी, नोकरदार, विद्यार्थ्यांना   नगर तालुक्याला   करावी लागत आसून . काही ठिकाणी रस्ता उंच, तर काही ठिकाणी सखल झाल्याने या भागात पावसाचे साचून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
प्रशासन वेळीच दखल घेतली पाहिजे आशी गुंडेगाव ग्रामस्थांची मागणी आसून या खड्डे बुजवण्याच्या लोकसभागात उद्योगजक सतिश चौधरी, युवा उद्योगजक  संतोष कोतकर , एकनाथ कासार, संदिप भापकर, अमोल येठेकर, गोरख कासार यांनी सहभाग नोंदवला.

No comments:

Post a Comment