सिव्हिलमध्ये ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 28, 2020

सिव्हिलमध्ये ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ...

 सिव्हिलमध्ये ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ...

अहमदनगर जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता असलेला हा पहिला प्लांट ः डॉ. सुनील पोखर्णा

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः सिव्हिल हॉस्पिटल मध्ये 20 के एल. या अत्याधुनिक अधिक क्षमतेच्या औक्सिजन प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ सिव्हिल सुर्जन डॉ. सुनील पोखर्णा यांच्या हस्ते जागेची पूजा करून व नारळ वाढवून करण्यात आला. सुमारे 70 लक्ष खर्चून हा ऑक्सिजन प्लांट सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रांगणात उभारण्यात येणार असून हा  प्लांट म्हणजे महत्वाकांगशी  प्रकल्प आहे हा प्लांट कार्यन्वित झाल्या नंतर 2000 रुग्ण याचा फायदा घेऊ शकतील येणार अशी माहिती यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखर्णा यांनी दिली.
    याप्रसंगी स्पार्क इंडस्ट्रीज  चे सुपरवायझर जय प्रकाश त्रिपाठी, अधिसेवीका एम वी गायकवाड, एम उजागरे, अधिपरिचारिका सुरेखा आंधळे, निलेश जाधव, हेमंत सोनवणे, दत्तात्रय आंबेकर, हरीश छजलानी, महेश काळे, गंगलू मिक्वी आदी मान्यवर उपस्थित होते. सिव्हिल सर्जन बोलताना म्हणाले कि, नगरचे पालकमंत्री नाम, हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सातत्याने केलेल्या  पाठपुरवठ्याने या प्लांटसाठी निधी उपलब्ध झालेला असून कॅव्हिडच्या संभाव्य दुसर्‍या साथीत तसेच इतरही वेळेस निश्चितच रुग्णानांसाठी हा प्लांट वरदान असेल. अतिशय गरजेच्या अश्या 20 के एल चा हा प्लांट कॅप्सुलच्या च्या आकारासारखा दिसेल. अति उच्च क्षमेतेचा हा ऑक्सिजन प्लांट डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात कार्यन्वित होईल. हा प्लांट 35 फूट  उंच असणार असून  सुरक्षेच्या कारणास्थव अतिशय बंदिस्त असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या ऑक्सिजन क्षमता असलेला हा पहिला प्लांट आहे. पहिल्या असलेल्या ऑक्सिजनच्या  पाईप लाइन ला डायरेक्ट ऑक्सिजन प्लांट मधून  कनेक्षन जोडून रुग्णांना 41.3 एम एम च्या 200 मीटर पाईप मधून ऑक्सिजनचा  पुरवठा होईल. अनेक रुग्णाचे प्राण देखील वाचविण्यासाठी हा प्लांट निश्चितच उपयोगी पडेल/गळती थांबेल,पाईप लाईन मुळे. ऑक्सिजन वाया जाणार नाही. यामुळे लाखो रुपयांची बचत देखील होणार आहे, असे सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखर्णा यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here