अमृत पाणी योजनेच्या कामा संदर्भात बैठक संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 28, 2020

अमृत पाणी योजनेच्या कामा संदर्भात बैठक संपन्न.

 अमृत पाणी योजनेच्या कामा संदर्भात बैठक संपन्न.

मार्च अखेर पाणी योजना मार्गी लावण्याचे आदेश ः सभापती कोतकर

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी अमृत पाणी योजनेची मुळा धरण ते विळद पंपींग स्टेशन पर्यतची पाहणी करून माहिती घेतली असता ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे या योजनेच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे नगर शहरामध्ये ठिकठिकाणी पाण्याची अडचण निर्माण होत आहे. यासाठी ठेकेदार, पाणी पुरवठा विभागाची बैठक तातडीने घेवून या योजनेला गती देवून मार्च अखेर पर्यत ही योजना पूर्ण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी यावेळी दिले.
     स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी अमृत पाणी योजनेची बैठक घेतली यावेळी पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते, सोनन इंजिनिअरींग चे संचालक पानसे, अभियंता गणेश गाडळकर, पीएमसीचे मुळे आदी उपस्थित होते. यावेळी दुसर्‍यांदा शेतकर्‍यांची पिकांचे पंचनामे करून त्यांना धनादेश द्यावा व त्यांच्या शेतातून लवकरात लवकर पाईप टाकण्याचे काम सुरू करावे. तसेच वनविभागाच्या जागेतून पाईप लाईन जात आहे. जिल्हा वन अधिकारी रेड्डी यांची भेट घेवून परवानगी घ्यावी. मुळा धरण येथील पंपींग स्टेशनचे काम मार्गी लावावे यासाठी प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरूवात करावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here