स्मितल वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

स्मितल वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड...

 स्मितल वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील स्मितल विठ्ठलराव वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निवड केली आहे. मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या बुधवार दि.25 रोजी पक्षाच्या बैठकीत वाबळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच अहमदनगर जिल्हा (दक्षिण) कार्याध्यक्षपदी राहुल उगले व अहमदनगर जिल्हा(उत्तर) कार्याध्यक्ष पदी सुभाष सांगळे यांची निवड करण्यात आली आहे.
स्मितल वाबळे हे महाविद्यालयीन जीवनापासून काँग्रेसी विचारसरणीच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत आहेत. 2005 सालापासून एन.एस.यु.आय व युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्षपरिवार वाढवण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे नीती, मूल्य, आर्थिक, औद्योगिक, परराष्ट्र धोरण, गरिबी हटाव,कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी धडाडीने प्रामाणिक काम केले आहे. वाबळे यांच्या कार्याची दखल घेऊन व मोठा विश्वास दाखवत पक्षाने त्यांना न्याय देऊन पक्षवाढीसाठी त्यांना खूप मोठी संधी दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील युवकांचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी उभे आहे. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. लॉक डाऊन काळात गोरगरिबांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी छोट्याश्या कार्यकर्त्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करतो याचा अभिमान व आनंद तालुक्यातील जनतेला झाला आहे. वाबळे यांच्यावर तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाबळे यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here