श्रीगोंद्यातील साखर कारखान्यातील कामगाराचा बेल्टमध्ये अडकून मृत्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

श्रीगोंद्यातील साखर कारखान्यातील कामगाराचा बेल्टमध्ये अडकून मृत्यू

 श्रीगोंद्यातील साखर कारखान्यातील कामगाराचा बेल्टमध्ये अडकून मृत्यू

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील एका प्रतिष्ठीत साखर कारखान्यात समिर बिरोजभाई शेख (वय 15) राहणार श्रीगोंदा फक्टरी ता.श्रीगोंदे जि.अ.नगर या बालकामगाराचा साखर कारखान्यात दि 17 रोजी बगॅस विभागात काम करताना बेल्टमध्ये अडकून यामध्ये डावा हात निकामी होवून त्याच्या छातीला व डोक्याला गंभीर जखमी होवून पुणे येथे उपचार सुरु असताना आज दि.18 रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला असुन पोलिस ठाण्यात अजुन कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही.
सविस्तर माहिती अशी कि दि.17 रोजी सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास समिर शेख हा बालकामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी घरच्या व्यक्ती बरोबर कारखान्यात कामाला गेला तेथे त्याला बग्यास विभागात भुसा ढकलण्याचे काम होते. ते करत असताना अचानक मशीच्या लोंखडी बेल्टमध्ये त्याचा डावा हात अडकला तो मोठमोठयाने ओरडल्या नंतर भोवतालच्या कामगारानी धाव घेऊन मशीन बंद करुण त्याला बाहेर काढले तोपर्यंत त्याचा डावा हात निकामी होवून छातीला व डोक्याला मोठा मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याने हि घटना कारखाना प्रशासनाला समजताच घटनास्थळी रूग्णवाहीका बोलावून वेळ न घालवता पुणे येथील नोबेल हास्पीटल येथे दाखल करुण त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करुण डावा हात काढण्यात आल्याने डोक्याला व छातीला मोठ्या जखमा असल्याने बाकी शस्त्रक्रिया रूग्ण शुध्दीवर आल्यानंतर होईल अशी माहिती नातेवाईकांनी दिली समिरची परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक असतानाच दुपारी समीरच्या संपूर्ण शरीरात रक्तस्त्राव झाल्याने तो उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. सदर उपचाराचा सर्व खर्च कारखाना प्रशासनाने केला असला तरी साखर कारखान्यात काम करण्यासाठी बाल कामगारांना परवानगी कशी दिली कोणाच्या सांगण्यावरुण बाल कामगार भरती करुण घेतले याची कामगार आयुक्त, सहकार व पोलिस खात्या मार्फत चौकशी करुण दोषीवर कार्यवाही झाली पाहिजे आणि सदर कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे अशी मागणी नातेवाईक यांच्याकडून होत आहे. समीरच्या मागे आजी, आई, लहान बहिण असा गरीब परिवार आहे.पोलिस दप्तरी रात्री उशीरा पर्यत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

No comments:

Post a Comment