रस्ता दुरूस्तीच्या लेखी आश्वासनानंतर चिंभळे ग्रामस्थांनी घेतला रस्तारोको मागे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

रस्ता दुरूस्तीच्या लेखी आश्वासनानंतर चिंभळे ग्रामस्थांनी घेतला रस्तारोको मागे

 रस्ता दुरूस्तीच्या लेखी आश्वासनानंतर चिंभळे ग्रामस्थांनी घेतला रस्तारोको मागे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील बेलवडी ते काष्टी या पंतप्रधान सडक योजनेतील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची चौकशी करून रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता चौरे डी. डी. यांनी दिल्या नंतर चिंभळे ग्रामस्थानी केलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पंचायत समिती सा. बां. विभागांचे उपअभियंता कांगुणे डी. डी., बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक प्रकाश बोराडे उपस्थित होते.
बेलवंडी ते चिंभळे मार्गे काष्टी या पंतप्रधान सडक योजनेतून 10 कोटी रुपये खर्चून 2018 सांली झालेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याच्या दुरुस्ती साठी चिंभळे ग्रामस्थानी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता चिंभळे बेलवंडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनास प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता चौरे डी. डी. यांनी भेट देऊन रस्त्याची पाहणी करून आंदोलकांना रस्त्याचे काम केलेल्या आर. आर. कपूर या ठेकेदार कंपनी कडून येत्या आठ दिवसांत रस्त्याचे दुरूस्तीचे काम सुरू करून गुणवत्ता पूर्ण काम करून घेण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलकांनी आपले आंदोलनं मागे घेतले.

No comments:

Post a Comment