नवनाथ सोबले यांनी केली शेतकर्‍यांची पाठराखण... स्वखर्चाने बसवून दिले रोहित्र... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

नवनाथ सोबले यांनी केली शेतकर्‍यांची पाठराखण... स्वखर्चाने बसवून दिले रोहित्र...

 नवनाथ सोबले यांनी केली शेतकर्‍यांची पाठराखण... स्वखर्चाने बसवून दिले रोहित्र...

रोहित्र जळून गेले पंधरा दिवस अंधारामध्ये होते सोबलेवाडीकर.....


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील सोबलेवाडी येथील तरुण उद्योजक नवनाथ सोबले यांनी शेतकर्‍यांची गरज पाहून गेल्या पंधरा  दिवसापासून सोबलेवाडी माळवाडी येथील रोहित्र जळून नादुरुस्त झाली होती रोहीत्र येण्यासाठी 54 नंबर पुढे असल्याकारणाने पंधरा दिवस रोहित्र चालू होण्यासाठी विलंब येत होता शेतकर्‍यांना शेतीला पाणी भरण्यासाठी विजेचा खोळंबा होता शेतकर्‍यांचे हाताशी आलेले पीक कांदे ज्वारी गहू जळून जाण्याच्या परिस्थितीमध्ये होते ते लक्षात येताच नवनाथ सोबाले यांनी या विज रोहित्रा बद्दल विद्युत महामंडळाकडे विचारणा केली असता रोहित करण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागतील असे समजले त्यानंतर त्यांनी लगेचच नगर ऑफिस संपर्क साधला असता तिथे एका दिवसांमध्ये डीपी मिळेल असं समजलं त्यावेळी उद्योजक नवनाथ सोबले यांनी स्वखर्चाने वीज रोहित्र काल बसवण्यात आले आणि शेतकर्‍या मध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले यावेळी नवनाथ सोबले यांचा सर्व शेतकरी बांधवांकडून  शाल श्रीफळ देऊन सत्कार ही करण्यात आला तर सर्व स्तरावरून नवनाथ सोबले यांची कौतुक होत आहे यावेळी विवेक शेरकर, तुकाराम शेरकर, चंद्रकांत शेरकर, बाळासाहेब शेरकर,  विलास शेरकर रामदास शेरकर, गजानन शेरकर सावकार शेरकर ,संतोष शेरकर, संदीप सोबले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment