भटके विमुक्त ओबीसी समज आरक्षणासाठी आक्रमक ! ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 19, 2020

भटके विमुक्त ओबीसी समज आरक्षणासाठी आक्रमक ! ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन

 भटके विमुक्त ओबीसी समज आरक्षणासाठी आक्रमक ! ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन

5 डिसेंबरला औरंगाबादला परिषदेचे आयोजन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेञ भगवानगड येथे जय भगवान महासंघाची बैठक होउन यात ओबीसी भटके विमुक्त हक्क परीषदेचा राज्यस्तरीय मेळावा औरंगाबाद येथे येत्या पाच तारखेला घेण्यावर चर्चा झाली यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी भगवानगड येऊन एल्गार केले यावेळी त्यानी ऊसतोड कामगाराचा प्रश्न   अजून सुटलेला नाही  . ओबीसीच्या विविध मागण्यासाठी आम्ही अहमदनगर येथे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत आहोत असे प्रदेश अध्यक्ष आनंद लहानगे यांनी  सांगितले .रमेश सानप म्हणाले की औरंगाबाद च्या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले, यावेळी बाबासाहेब वाघ यांनी भगवानगडावर बाळासाहेब सानप यांचे स्वागत केले, तालुका अध्यक्ष  प्रल्हाद किर्तने पाथर्डी शहर अध्यक्ष महेश दौंड पाथर्डी तालुका युवा उपाध्यक्ष विजय भैया फुंदे शेवगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र केदार युवा तालुका अध्यक्ष पप्पु केदार जय मल्हार सेना तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे अवीनाश वाघ अजिनाथ बटुळे  तांदाळे सर खेडकर अशोक गर्जे अदि  हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा आरक्षणाला पाठींबा जाहीर करताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण सरकारने द्यावे तसेच महाराष्टातील लोकसेवा आयोग व सरकारी भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करावी अशीही मागणी करण्यात आली महाराष्ट सरकारने ऊसतोड मजुर कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी पासुन कोयता बंद आंदोलन करण्याची भूमिका जय भगवान महासंघाने घेतली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here