पोखरी विकास सेवा सोसायटी सभासदांना 10 टक्के लाभांश वाटणार ः काशिनाथ दाते सर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

पोखरी विकास सेवा सोसायटी सभासदांना 10 टक्के लाभांश वाटणार ः काशिनाथ दाते सर

 पोखरी विकास सेवा सोसायटी सभासदांना 10 टक्के लाभांश वाटणार ः काशिनाथ दाते सर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पोखरी विकास सेवा सोसायटी संचालक मंडळ मिटींग होवुन सभासदांना 2019-20 या आर्थिक वर्षात झालेल्या निव्वळ नफा रु. 48.04 लक्ष वाटणी करणेबाबत सविस्तर चर्चा होवून इतर सर्व तरतुदी वजा जाता 10 टक्के वाटप करण्याचे ठरले. त्यानुसार रु. 8,35,986/- ची लाभांष वाटणी होणार असून त्याचा लाभ 1077 सभासदांना मिळणार असल्याचे चेअरमन बाबासाहेब एकनाथ रोकडे यांनी सांगितले. वरील नफा वाटणी नुसार सहकार खात्याने दि. 02/11/2020 रोजी काढलेला जी.आर नुसार लाभांष वाटणीचा अधिकार कोरोना परिस्थिती मुळे संचालक मंडळाला दिलेला आहे. त्यानुसार चर्चा होवून 10 टक्के लाभांश वाटणीचा निर्णय घेण्यात आला. परंतु नफ्याची रक्कम ही संस्थेच्या कर्ज वाटपात गुंतवणूक झालेली आहे त्यामुळे संस्थेला एकत्रित एकाच वेळी लाभांश सभासदांचे सेव्हिंग खात्यावर वर्ग करणे शक्य नाही संचालक मंडळाने बँकेचे तालुका वि. अधिकारी यांना सदर रक्कम संस्थेस कर्ज रूपाने उपलब्ध करून देणे बाबत चर्चा केली असता अशा पद्धतीने संस्थेस कर्ज देता येणार नाही जसे जसे वसूल होईल तसे याप्रमाणे वाटलेल्या कर्जातून वसूल करून तीच रक्कम लाभांश वाटप करता येईल असे सुचवले त्यानुसार सभासद यादीच्या अनुक्रम नंबर नुसार सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर लाभांश वर्ग करण्यात येईल असे संस्थेचे सचिव  बी. बी. पानमंद यांनी सांगितले. त्याचप्रमाणे इमारत निधी ला देखील सुमारे रुपये 12.  50 लक्ष तरतूद केलेली असून त्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यात येणार असून वसूल रकमेतून ही रक्कम त्या खात्यावर वर्ग करण्याचे ठरले यावेळी व्हाईस चेअरमन सौ रेखा राजू खैरे, संचालक काशिनाथ महादू दाते, अण्णासाहेब काशिनाथ पवार, संपत सखाराम आहेर, उत्तम रभाजी आरोटे, अशोक विठ्ठल पवार, सूर्यभान बाबुराव काशीद, रोहिदास गवराम गुंजाळ , सौ.संगीता जयसिंग  आग्रे, सौ. शोभा कुंडलीक वाकळे,  आदी सर्व संचालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment