बुरूडगांव रोड परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू- नगरसेवक गणेश भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

बुरूडगांव रोड परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू- नगरसेवक गणेश भोसले

 बुरूडगांव रोड परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत  करा अन्यथा आंदोलन करू-  नगरसेवक गणेश भोसले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गेल्या दोन महिन्यापासून सणासुदीच्या काळामध्ये बुरूडगांव रोड परिसरातील सारसनगर, भोसले आखाडा, स्टेशन रोड, आगरकर मळा, नानाजी नगर, चौरे मळा, फुलसौंदर मळा, पोकळे मळा, समता कॉलनी विनायक नगर, माणिक नगर, डॉक्टर कॉलनी परिसरामध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे मनपाच्या विरोधात महिला संताप व्यक्त करित आहे. मळा धरण येथे मोठया प्रमाणात पाणी साठा असतानाही शहरामध्ये ती्व्र स्वरूपाची पाणी टंचाई का निर्माण झाली आहे. ही पाणी टंचाई नियोजन नसल्यामुळे कृत्रिम स्वरूपाची आहे का सर्वत्र पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना मुबलक स्वरूपात पाणी मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून समर्थ नगर येथील पाण्याची टाकी बांधून तयार आहे. या टाकीमधून आजतागायत पाणी पुरवठा केलेला आहे; तरी प्रशासनाने ही पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरून फेज-2 द्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा.  यासाठी मनपा पाणी पुरवठा विभागाने 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन मनपात करण्यात येईल अशी माहिती नगरसेवक मा.श्री.गणेश भोसले यांनी दिली.

बुरूडगांव रोड परिसरातील तीव्र स्वरूपाच्या पाणी टंचाई संदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या आयोजीत बैठकीत नगरसेवक मा.श्री.गणेश भोसले बोलत होते. यंत्र अभियंता श्री.परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते, अभियंता श्री.गणेश गाडळकर, श्री.रोहोकले, श्री.गिते, श्री.वॉलमन उपस्थित होते.

यावेळी श्री.परिमल निकम म्हणाले की, येत्या 7 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टिने उपाय योजना केल्या जातील. सर्व लाईनची तपासणी करून दुरूस्ती केली जाईल. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करू. समर्थ नगर पाण्याची टाकी सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून लवकरच ही पाण्याची टाकी भरण्यात येणार असून याटाकीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन नगरसेवक मा.श्री.गणेश भोसले यांना दिले.

No comments:

Post a Comment