दूध उत्पादक शेतकर्‍यांना हिवाळ्यात जिव्हाळ्याची ऊब ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

दूध उत्पादक शेतकर्‍यांना हिवाळ्यात जिव्हाळ्याची ऊब !

 दूध उत्पादक शेतकर्‍यांना हिवाळ्यात जिव्हाळ्याची ऊब !

पाडळी रांजणगावमध्ये गवळ्यांना स्वेटर वाटप...


पारनेर /प्रतिनिधी:- पाडळी रांजणगाव येथील त्रिमूर्ती दूध संकलन आणि शितीकरण केंद्राच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्‍यांना हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून स्वेटरच्या रूपाने जिव्हाळ्याची भेट देण्यात आली. बुधवारी केंद्रावर हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. चेअरमन पंडित लक्ष्मण करंजुले यांनी पुढाकार घेऊन हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला.

पारनेर तालुक्यातील सर्वाधिक दूध उत्पादन घेणार्‍या गावांमध्ये पाडळी रांजणगाव हे एक अग्रेसर गाव आहे. धवल ग्राम म्हणूनही या गावाची वेगळी ओळख आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. गावात पंडित लक्ष्मण करंजुले यांचे त्रिमूर्ती दूध संकलन आणि शितीकरण केंद्र आहे. याठिकाणी दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांकडून दूध संकलित करून ते शितीकरण केले जाते. त्यानंतर प्रभात या श्रीरामपूर येथील दुग्ध उद्योग समूहाला दूध पाठवले जाते. दरम्यान याठिकाणी दर्जेदार दूध संकलित केले जाते. त्यानुसार उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर दुधाला भाव दिला जातो. त्रिमूर्ती दूध संकलन आणि शितीकरण केंद्र पंचक्रोशीत अग्र क्रमांकावर आहे. दरम्यान केंद्र आणि दूध उत्पादक शेतकरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यामुळे त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांना पाठबळ आणि प्रोत्साहन दिले जाते. वेळप्रसंगी गाई खरेदी तसेच खुराकाकरीता बिनव्याजी भांडवल सुद्धा दिले जाते.  यंदा उत्पादकांच्या खात्यावर बोनस सुद्धा जमा करण्यात आला. कोरोना वैश्विक संकटाच्या काळातही शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही या अनुषंगाने प्रभात उद्योग समूह आणि त्रिमूर्ती दूध संकलन केंद्राकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने त्रिमूर्ती दूध डेअरीकडून सर्व सभासदांना स्वेटर देण्यात आले. बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश नागवडे ,सोसायटीचे माजी चेअरमन कचरू उबाळे, ताराचंद करंजुले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुखदेव उबाळे, जय हनुमान आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र उबाळे, निलेश लंके प्रतिष्ठान चे गोरख उबाळे,प्रद्युम्न करंजुले, पाटील डेअरीचे संचालक गणेश एकनाथ करंजुले, जयदीप करंजुले, दीपक करंजुले, नारायण खेसे , राजेंद्र करंजुले , बजरंग साठे यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here