जि.प. सदस्या राणी लंके यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये संविधान दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

जि.प. सदस्या राणी लंके यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये संविधान दिन साजरा

 जि.प. सदस्या राणी लंके यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये संविधान दिन साजरा!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः भारतीय संविधाना विषयी जनजागृती व्हावी, संविधानाची जनतेमध्ये प्रचार व प्रसार होऊन संविधानामुळे सर्वसामान्य जनतेला मिळालेले मूलभूत हक्क, अधिकार, अभिव्यक्ति स्वातंत्र्य ही मूल्ये लोकांना समजावी याकरिता या संविधान दिनाचे गुरुवारी पारनेर येथे आयोजन करण्यात आले होते.
पारनेर येथे विविध ठिकाणी संविधान दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला सौ.राणीताई निलेश लंके यांनी आमदार जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची व संविधानाची पूजा करून संविधानाचे महत्व जनतेपर्यंत पोहोचविण्या साठी उपस्थितांना आवाहन केले.तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करताना समाजामधील सर्व घटकांना समाजामध्ये समान न्याय व अधिकार मिळवून दिला आहे.
संविधानाची निर्मिती करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे. हे असेही ही सौ.लंके यांनी आंबेडकर स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकतंत्र गणराज्य बनविण्यास तसेच त्यांच्या समस्त नागरिकांना सामाजिक,आर्थिक, आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता निर्धार करून आपल्या या संविधाना दिनी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुमावत यांनी संविधानीक प्रतिज्ञचे वाचन केले.त्या आशयाची  वसुंधरा बचाव अभियानाची शपथ घेतली.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सर्व उपस्थितांनी शपथ घेतली की माझ्या दैनंदिन जीवनशैलीत पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही त्याकरिता प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा पर्यावरण पूरक इंधन व विद्युत शक्तीवर चालणारी वाहनांचे वापर करावा पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे याची बचत करावी सभोवतालच्या नैसर्गिक जलस्त्रोतांचा म्हणजेच विहिरी, नद्या,तलाव यांचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.व सभोवतालचा प्रदेश स्वच्छ ठेवावा तसेच नैसर्गिक,आदिवस्तीत वास्तव करणारे प्राणी,पशु,पक्षी व जलचर यांचे रक्षण करावे.समृद्ध पर्यावरणाचा रक्षणाकरिता आपल्या वाढदिवसा निमित्ताने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे तसेच निसर्गाच्या संबंधित पृथ्वी,जल,वायू अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करावे तसेच माझी वसुंधरा स्वच्छ सुंदर हरित व पर्यावरण पूरक राखण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे.असा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.चिमुकल्यांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन आयोजकांकडून करण्यात आले होते.त्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या सौ. राणी निलेश लंके यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रमाणपत्र व छोटेसे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी संविधानदिनी राणीताई लंके यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुमावत,डॉक्टर विद्या कावरे , सरपंच राहुल झावरे,नगरसेव किसन गंधाडे,मुदतसर सय्यद,नंदकुमार देशमुख,संदीप चौधरी,श्रीकांत चौरे,बाळासाहेब नगरे,सचिन नगरे,राजेंद्र करंदीकर,सुभाष कावरे,संतोष नगरे, मनोज शिंदे,महेश ठूबे,दादा शेटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here