’खरे शिक्षक’ कविता महाराष्ट्रात द्वितीय, संदीप बोरगे यांचे यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

’खरे शिक्षक’ कविता महाराष्ट्रात द्वितीय, संदीप बोरगे यांचे यश

 'खरे शिक्षक’ कविता महाराष्ट्रात द्वितीय, संदीप बोरगे यांचे यश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संदीप बोरगे यांच्या ’ खरे शिक्षक ’ कवितेने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. औरंगाबाद येथील एकत्व ग्रुप तर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेत मुंबई , पुणे , नाशिक,रत्नागिरी ,परभणी,जळगाव, यवतमाळ तसेच  कर्नाटक आणि बेंगलोर अशा बाहेरील राज्यातून स्पर्धेसाठी एकुण 974 कविता आल्या होत्या.  सध्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे संदीप बोरगे यांची ’ खरे शिक्षक ’ कविता सर्वोत्तम  ठरून द्वितीय क्रमांक पटकावून गेली. प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे. कवी,लेखक अशोक कौतिक कोळी व गझलकार राजू आठवले यांनी परीक्षक म्हणुन काम केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here